नागरिकांचा संताप:टाकरखेडा संभूत पाणीटंचाई; नवीन जलकुंभ अद्याप बंदच, समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा
येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकरखेडा संभूचा समावेश असला तरी नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच निकट भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या…