शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढ्यात मोर्चा:मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, शेतकऱ्यांचा थेट इशारा
राज्यात प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित ‘शक्तीपीठ महामार्गा’ला सोलापूर जिल्ह्यातून आता टोकाचा विरोध सुरू झाला आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला असून, आज माढ्यात भव्य मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. “जर बळजबरीने जमिनी संपादन करून आमच्या सुपीक बागा उध्वस्त केल्या, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही,” असा…