गोंदियात मोकाट कुत्र्यांची दहशत:घराबाहेर उभ्या असलेल्या शाळकरी मुलीवर 5-6 कुत्र्यांचा हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद
गोंदिया शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. शाळेत जाण्यासाठी घराबाहेर उभ्या असलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर ५ ते ६ मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. सुदैवाने एका सतर्क शेजाऱ्याने वेळीच धाव घेतल्याने या मुलीचा जीव वाचला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे चिमुकली प्रचंड दहशतीखाली असून, हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…