Headlines

प्रवासी सीटखाली दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक:डॅझलिंग लायटिंगचा थाटही नडला, श्रीरामपूर आरटीओची 27 स्लीपर बसेसना 1.45 लाखांचा ऑन द स्पॉट दंड‎

प्रवासी वाहतुकीचा परवाना घ्यायचा आणि बसमधून चक्क व्यावसायिक माल अन् दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक करायची, या ‘धंद्या’चा श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पर्दाफाश केला आहे. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डोळे . प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये…

Read More

भंडारदरा 35टक्के भरले, मुळा धरणात यंदा प्रथमच नवीन पाण्याची आवक:भंडारदऱ्यात 24 तासांत 400 दलघफू नवे पाणी, हरिश्चंद्रगड परिसर जलमय

जून महिना कोरडा गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाची आणि अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह संपूर्ण अकोले तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवाधार ‘बॅटिंग’ सुरू केली आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर आणि रतनवाड . पाऊस असाच कोसळत राहिल्यास मंगळवारपर्यंत धरणाचा साठा ५ हजार दलघफूटांचा टप्पा ओलांडेल. दरम्यान, भंडारदऱ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून २६९७ क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात…

Read More

सलग 39 व्या वर्षी भद्रा मारुती पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवास‎

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९व्या वर्षी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व श्री हनुमानाची पूजा, आरती आणि हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर माजी…

Read More

तेलंगणात पतीला ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून मारले:पत्नी नर्स, विवाहबाह्य संबंधातून हत्या; छतावरून ढकलले होते, पण वाचला

तेलंगणामध्ये एका नर्सने प्रियकरासोबत मिळून आपल्या 35 वर्षीय पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 30 जून रोजी पतीला छतावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता. पण तो वाचला. त्यानंतर तिने रुग्णालयात उपचारादरम्यान त्याच्या नसेत लावलेल्या ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर इंजेक्ट केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात 32 वर्षीय आरोपी महिला संध्या, तिचा प्रियकर अनिल…

Read More

महाराष्ट्रातील केवळ तीन संतांच्या पालखी रथांना ‘जू’ देण्याचा मान:संत शेख महंमद महाराज पालखी रथासाठी ‘जू’ अर्पण करून जपली पवित्र परंपरा

सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलांसाठी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील बाबासाहेब डुबे, प्रसाद नवथर, पंडित चव्हाण, विश्वास महाडिक आणि विवेक महाडिक यांनी पारंपरिक ‘जू’ अर्पण करून भक्तीभावाची अनोखी परंपरा जपली आ . महाराष्ट्रात केवळ तीन संतांच्या पालखी रथांना अशा प्रकारे ‘जू’ अर्पण करण्याचा मान असून, त्यामध्ये श्री संत शेख महंमद…

Read More

मंगळवार पॅटर्नच्या माध्यमातून राष्ट्रवादी जनतेचे प्रश्न सोडविणार:सटाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष खैरे यांची माहिती‎

बागलाण तालुक्यात नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दर महिन्याच्या एका मंगळवारी विशेष आढावा बैठक घेऊन ‘मंगळवार पॅटर्न’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केली. शहरातील राधाई मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खैरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री…

Read More

जामनेरातील अपर तहसील कार्यालय शेंदुर्णीतच व्हावे:सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी निर्धार; नगराध्यक्ष अग्रवाल यांच्याकडून पाठपुराव्याची ग्वाही‎

जामनेर तालुक्यासाठी मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय शेंदुर्णी येथेच व्हावे, या मागणीसाठी शेंदुर्णी येथील नागरिकांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. यासंदर्भात आठवड्यातून दोनदा प्रथम नगरपंचायत कार्यालय व त्यानंतर माहेश्वरी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेंदुर्णी येथेच कार्यालय सुरू करण्याची मागणी लावून…

Read More

बंगाल गँगरेप मर्डर – मुख्य आरोपीसह 3 जणांना बेड्या:बारुईपूरमध्ये जिवंत मुलीला तलावात फेकले होते; शवविच्छेदन अहवालात दावा – फुफ्फुसे, पोटात पाणी आढळले

बंगाल पोलिसांनी सोमवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख आनंद सरदार अशी झाली आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला शहरातील बाजारपेठेतून पकडले. या अटकेसह प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 6 लोकांची एसआयटी (SIT) स्थापन…

Read More

धरण उशाला अन् कोरड घशाला; भर पावसात टाकेद तहानलेले:12 दिवसांनी गावात येते पाणी; कोट्यवधींच्या योजनांनंतरही नागरिकांचे हाल‎

प्रभू श्रीरामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि ‘सर्वतीर्थ टाकेद’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेद गावासह बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी व परिसरात भर पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने . शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर नल से जल आणि जलजीवन मिशनसारख्या योजनांवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घरोघरी…

Read More

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय प्रस्थान:24 जुलैला पंढरपुरात होणार आगमन; अठरा दिवस संतविचारांचा महोत्सव‎

संत ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र आपेगावातून सोमवारी (६ जुलै) सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या माता-पिता पालखी, दिंडी व रथ सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान पालखी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, आमदार विलास भुमरे यांच्या पत्नी वर्षा भुमरे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पोपट औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” ,…

Read More