एसटीच्या '44 प्रवासी मिळवा' उपक्रमाला चांगला प्रतिसाद:आषाढी एकादशीसाठी 46 हून अधिक गावांतून विशेष बस पंढरपूरला दाखल
राज्य परिवहन महामंडळाच्या ‘४४ प्रवासी मिळवा, गावातूनच थेट बस पंढरपूरला’ या विशेष उपक्रमाला यंदा अमरावती जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४६ हून अधिक विशेष बसेस पंढरपूरकडे रवाना झाल्या असून, त्या शनिवारी तेथे दाखल झाल्या. यामुळे या गावांतून आलेल्या शेकडो वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य झाले. एसटी महामंडळाने हा उपक्रम गेल्या आठवड्यापासून…