Headlines

स्वतंत्र्यदिनी हिंगणघाट हादरले:ध्वजारोहणासाठी निघालेल्या 3 शाळकरी मुलींना भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडले, तिघींचाही मृत्यू

एकिकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात न्हाऊन निघाला असताना, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरावर मात्र अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडलेल्या तीन शाळकरी मुलींच्या दुचाकीला एका सुसाट खासगी ट्रॅव्हल्सने चिरडल्याची धक्कादायक घटना आज घडली. या भीषण अपघातात तिन्ही अल्पवयीन विद्यार्थिनींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नेमका अपघात कसा झाला? समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि…

Read More

लोकशाहीत मतभेद स्वाभाविक, पण जबाबदारीचे भान हवे:सरसंघचालक मोहन भागवतांचा तरुणांना संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर आयोजित ‘नागपूर थॉट्स’ या विशेष कार्यक्रमात तरुण पिढीला मार्गदर्शन केले. लोकशाहीमध्ये मतभेद आणि आंदोलने स्वाभाविक असली तरी नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या भाषणात डॉ. भागवत यांनी लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्यांवर विशेष भर दिला. ते म्हणाले…

Read More

नाशिक 5 दिवसांत खड्डेमुक्त करणार!:बनावट वर्कऑर्डर प्रकरणात माझाच दूरचा नातेवाईक दोषी, त्यालाही सोडणार नाही – गिरीश महाजन

नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि आगामी कुंभमेळ्याच्या नावाने कोट्यवधी रुपयांची बोगस वर्कऑर्डर देण्याच्या मोठ्या घोटाळ्यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, बनावट वर्कऑर्डर घोटाळ्यातील मुख्य आरोपी हा त्यांचा दूरचा नातेवाईक असला, तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्वतःच पोलिसांना दिले आहेत. तसेच, येत्या 4-5…

Read More

पाणीबाणी:कुरनूर 16 टक्क्यांवर; अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गीसह 35 गावांत टंचाई

पावसाळ्याचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही, अक्कलकोट तालुक्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या कुरनूर धरणात सध्या केवळ १६ टक्के (१३५.३८ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा अवघा १ टक्का आहे. गेल्या वर्षी याच काळात धरण १०० टक्के भरले होते, यावरून यंदाच्या पाणीटंचाईच्या भीषण स्थितीचा अंदाज येतो. या धरणावर तीन…

Read More

बिग बॉस 20 सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात:ललित मोदी शोमध्ये सामील होण्याच्या बनावट बातम्यांवर संतापले, कायदेशीर कारवाई केली

आयपीएलचे संस्थापक आणि व्यावसायिक ललित मोदी, बिग बॉस २० मध्ये सहभागी होण्याच्या बातम्यांवर संतापले आहेत. त्यांनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगत, अशा बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते या शोचा भाग बनत नाहीत आणि बनणारही नाहीत. ललित मोदी यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर (पूर्वी ट्विटर) या बातम्यांचे…

Read More

'अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असावा':शिवप्रतिष्ठानच्या पोस्टरवरून वाद, संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

आज, १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, राज्यात मात्र एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या संस्थेने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका पोस्टरवरून हा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये ‘अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडण्यात आली असून, यावरून काँग्रेसने आक्रमक…

Read More

या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ:सोने ₹2742 ने वाढून ₹1.52 लाखांवर पोहोचले, चांदी ₹2461 ने महाग होऊन ₹2.31 लाख प्रति किलो

या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 2,742 रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी 1.50 लाख रुपयांवर होता. तर, चांदी 2.31 लाख रुपये प्रति किलोवरून वाढून 2.34 लाख रुपयांवर पोहोचली आहे, तिच्या किमतीत 2,461…

Read More

लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणाची लवकर अंमलबजावणी करा:खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या महिला आरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महिला आरक्षणाचे विधेयक 2023 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेत सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झाले आहे. त्यामुळे आता त्याच्या अंमलबजावणीसाठी आणखी विलंब होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली….

Read More

चोरी:पोलिस ठाण्यातून होमगार्डच्या पाहुण्याकडूनच लॅपटॉप चोरी

चोऱ्या रोखण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या कार्यालयातूनच चक्क एका पोलिस अधिकाऱ्याचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार वैराग पोलिस ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आला. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत सीसीटीव्हीच्या आधारे या संशयिताला अवघ्या काही तासांतच वैरागपासून चार किलोमीटर अंतरावरील मानेगाव येथून ताब्यात घेतले. होमगार्डचा पाहुणाच असल्याचे उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून काळेगाव…

Read More

‘ऑपरेशन टायगर’वरून कैलास पाटलांचा पलटवार:सरनाईकांना आव्हान, म्हणाले- पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा

तुळजापूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर प्रश्न उपस्थित करताना केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील यांच्यावर ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग असल्याचा…

Read More