Headlines

चमोली बोगदा दुर्घटना- 8वा मृतदेह सापडला, 2 मजूर अजूनही बेपत्ता:7 पंप मशीनद्वारे पाणी बाहेर काढणे सुरू, चिखल बचाव पथकाचा मार्ग अडवत आहे

चमोली येथील विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या अपघातानंतर सुमारे 42 तासांनी आठवा मृतदेह सापडला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार सुमन यांनी याची पुष्टी केली आहे. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय, गोपेश्वर येथे पाठवण्यात आला आहे. मजुराची ओळख छत्तीसगडच्या देवनाथ म्हणून झाली आहे. 13 ऑगस्टच्या संध्याकाळी अचानक पाणी आणि ढिगारा आल्याने बोगद्यात 22…

Read More

'हा तर दिमागी नक्षलवाद':वंदे मातरम'च्या वादावरून देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींवर हल्लाबोल, काय म्हणाले मुख्यमंत्री?

स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी उपस्थितांना ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत पूर्ण गाण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप भाजपने केल्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस पक्षाने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले असले तरी, यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल…

Read More

स्वातंत्र्यानंतर 79 वर्षांनी बिनागुंडात प्रथमच फडकला राष्ट्रध्वज:नक्षली दहशतीनंतर ग्रामस्थांनी अनुभवला 'स्वातंत्र्याचा सूर्योदय'

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अत्यंत दुर्गम, घनदाट जंगल आणि कुमरी पहाडाच्या कुशीत वसलेल्या बिनागुंडा गावात अखेर एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. स्वातंत्र्याच्या तब्बल 79 वर्षांनंतर पहिल्यांदाच या गावात अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. गेल्या सात दशकांपासून हे गाव लाल सावलीच्या भीषण छायेत होते. नक्षलवाद्यांची कमालीची दहशत, घनदाट जंगल आणि अत्यंत कठीण भौगोलिक…

Read More

"तुम्ही नोकर आहात, नोकरांसारखे वागा":आमदार संतोष बांगर जिल्हा परिषदेच्या बैठकीत भडकले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सुनावले

आपल्या वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे कायम चर्चेत राहणारे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चांगलीच खडाजंगी झाली. आरोग्य विभागातील बदल्यांच्या मुद्द्यावरून संतापलेल्या आमदार बांगर यांनी अधिकाऱ्यावर थेट शब्दांत हल्लाबोल करत, “तुम्ही नोकर आहात, त्यामुळे नोकरांसारखेच वागा,” अशा शब्दांत त्यांना भर बैठकीत सुनावले. या आक्रमक…

Read More

‘ऐ मेरे वतन के लोगों…’च्या सुरांनी जागवली देशभक्ती:‘लिखो अपने दिल की बात’ला संभाजीनगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कलेतूनही उमटला देशप्रेमाचा सूर

‘ऐ मेरे वतन के लोगों, ज़रा आँख में भर लो पानी… जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी…’ हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं… देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचं. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. यंदा भारताच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या…

Read More

हेरंब प्राथमिक व ज्ञानेश विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा:देशभक्तीपर गीते आणि चिमुकल्यांच्या वेशभूषेने जिंकली उपस्थितांची मने

उन्नती शिक्षण संस्था संचलित हेरंब प्राथमिक विद्यामंदिर व ज्ञानेश विद्यामंदिर माध्यमिक शाळा, सिडको एन–2 येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे अजय वझरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव मीनाक्षीताई विटोरे मॅडम, अध्यक्ष शैलेंद्र विटोरे सर, उपाध्यक्षा श्रीमती पूजा पऱ्हे मॅडम, माध्यमिक शाळेच्या…

Read More

शैक्षणिक उपक्रम:ग्रंथालय विद्यार्थ्यांचा ज्ञानविकास आणि व्यक्तिमत्व घडवणारे केंद्र : डॉ. सागडे

ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानविकासाचे आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील उपलब्ध ज्ञानसंपदेचा अधिकाधिक उपयोग करून आपल्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन न्यु आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या…

Read More

कौैठा:बालाजी देडगाव येथे हरिनाम सप्ताहाची सांगता

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे संत नामदेव महाराज व संत सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी स्वामी प्रकाशानंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात झाली. सप्ताहाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, नामांकित कीर्तनकारांची कीर्तने व हरिनाम संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील भाविकांनी…

Read More

तिरंगा हातात, देशभक्ती मनात:नेप्तीत छत्रपती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची रॅली

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी नेप्ती गावात तिरंगा रॅली काढली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने झालेल्या या रॅलीत विद्यार्थी-विद्यार्थ िनी सहभागी झाले. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली. ‘हर घर तिरंगा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी नेप्ती जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तसेच…

Read More

आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा स्कूलची घोडदौड कायम:आठरे पाटील स्कूलने पेनल्टी शूटआऊटमध्ये आर्मी पब्लिक स्कूलचा केला पराभव‎

फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य आणि बचावात्मक खेळाचे दर्शन घडविले. मुलींच्या १६ वर्षांखालील गटाची उपांत्य फेरी तसेच मुलांच्या १२, १४ आणि १६ वर्षांखालील गटातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगले. काही सामने एकतर्फी झाले तर आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल यांच्यातील १४ वर्षांखालील सामना गोलशून्य…

Read More