Headlines

हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणाले- कॉलेजमध्ये पहिल्यांदा सिगारेट ओढली:नंतर सोडू शकलो नाही; हुक्का बारची याचिका फेटाळली

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मंगळवारी हुक्का बार चालवण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने म्हटले की, उत्तर प्रदेशात आता हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आणि इतर सार्वजनिक ठिकाणांच्या निर्धारित धूम्रपान क्षेत्रांतही ग्राहकांना हुक्का देता येणार नाही. न्यायमूर्ती शेखर बी. सराफ आणि न्यायमूर्ती अवधेश चौधरी यांच्या खंडपीठाने म्हटले की, हुक्का बार चालवणे आणि रेस्टॉरंटमध्ये हुक्का देणे हे सिगारेट आणि…

Read More

CISF Jawan Firing in Jammu Kathua; Multiple Casualties Reported

कठुआ3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जम्मू-काश्मीरमधील कठुआच्या बसोहली कॅम्पमध्ये CISF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात CISF च्या 4 जवानांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका असिस्टंट कमांडंटचाही समावेश आहे. हे जवान हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बसोहलीच्या मशका गावातील सेवा-III पॉवर प्रोजेक्टच्या सुरक्षेसाठी तैनात होते. कोणत्या तरी कारणावरून दोन जवानांमध्ये वाद झाला. त्याचदरम्यान त्यापैकी एकाने अंदाधुंद…

Read More

Parli BJP Leader Nephew Krishna Munde Attacked; CCTV Footage Surfaces

परळी शहरात भरदिवसा तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे गटनेते तथा सभापती पवन मुंडे यांचे पुतणे कृष्णा मुंडे यांच्यावर 16 ते 17 जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांचा वापर करण् . मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा मुंडे हे परळी शहरात असताना काही व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. सुरुवातीला…

Read More

पुणे गांधी भवनमध्ये महात्मा गांधी सप्ताह सुरू:1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान वैचारिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल; मान्यवर सहभागी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा नव्या पिढीला परिचय व्हावा आणि त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या संयुक्त विद्यमाने गांधी भवन, कोथरूड येथे १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे यंदाचे १५वे वर्ष आहे. सप्ताहात…

Read More

अखिल मंडई मंडळाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा:अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांचे नागरिकांना कष्टांची जाणीव ठेवण्याचे आवाहन

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीनंतर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपण किती कचरा करतो, याचे भान असणे आवश्यक असून स्वच्छतेची अपेक्षा ठेवताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा विचार केला पाहिजे, असे मत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी व्यक्त केले. अखिल मंडई मंडळाच्या वतीने गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या…

Read More

पुण्यातील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग, कागदपत्रे जळाली:सहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत रोकड सुरक्षित, कोणीही जखमी नाही

लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकात असलेल्या बँक ऑफ इंडिया या बँकेच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावर मंगळवारी आग लागली. त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, झेरॉक्स यंत्रणेला आगीची झळ पोहोचली. मात्र, रोकड सुरक्षित आहे. आगीत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी सव्वा तासाच्या प्रयत्नांतर आगीवर नियंत्रण मिळवले. गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकात (शगुन चौक) बँक ऑफ…

Read More

पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, प्रियकर अटकेत:प्रेमाच्या जाळ्यात ओढून दागिने मोडले, पतीपासून वेगळे राहण्यास भाग पाडले

प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला ओढून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. महिलेला पतीासून वेगळे राहण्यास भाग पाडून तिचे दागिने मोडण्यात आले. आरोपीच्या त्रासामुळे महिलेने आत्महत्या केली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. अभिजित जगदीश शिंदे (वय ३२, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत…

Read More

हिंगोली जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या घरी आज लागणार ‘आशीर्वादाचा दिवा’:मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची माहिती

हिंगोली जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय सेवांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी बुधवार, ३० ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन ही कार्यवाही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले. सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य…

Read More

छोट्या कपड्यांवर कृती सेननची गूढ पोस्ट:स्कर्ट, बुरखे आणि डायपरचा उल्लेख; रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर ट्रोल झाली होती

रक्षाबंधन जाहिरात वादानंतर बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने सोशल मीडियावर विक्टिम ब्लेमिंग (पीडितेला दोषी ठरवणे) याबाबत एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. तिने एक कोट शेअर करत संदेश दिला आहे की, लैंगिक छळाचा संबंध महिलेच्या छोट्या कपड्यांशी नसतो. यापूर्वी एका ज्वेलरी ब्रँडने ट्रोलिंगनंतर कृती सेननची रक्षाबंधन जाहिरात हटवली होती. कपड्यांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कृतीने…

Read More

कमी पावसामुळे रबी हंगामाचे आव्हान:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची केंद्राकडे 1,000 कोटींची मागणी, 10 लाख ज्वारी बीज किट्सचीही मागणी

महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदा कमी आणि असमान पाऊस झाल्याने आगामी रबी हंगामात शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा कमी असल्याने रबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी केली आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी अतिरिक्त 500 कोटी रुपये, सूक्ष्म सिंचनासाठी 500 कोटी रुपये आणि 10 लाख रबी ज्वारी…

Read More