Headlines

बारामतीत घराच्या ओसरीत झोपलेल्या दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या:सोन्याचे मंगळसूत्र लुटण्यात आल्याचे उघड, अज्ञातावर गुन्हा दाखल

बारामती तालुक्यातील शेरेवाडी (बाबुर्डी) गावात ओसरीत झोपलेल्या २ वृद्ध महिलांची अज्ञाताने शस्त्राने गळा चिरून हत्या केली. इंदुमती मारुती लडकत (७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (६५) अशी मृत महिलांची नावे असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. . मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लुटण्यात आल्याचे समोर आल्याने चोरीच्या उद्देशातून हे दुहेरी…

Read More

इंडिगोचे विमान मुंबईत उतरलेच नाही:सव्वा तास हवेत घिरट्या, सुरत विमानतळावर प्रवासी तासन्‌तास अडकले

दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामान आणि जोरदार टर्ब्युलन्सचा फटका बसला. मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिकूल हवामानामुळे विमानाला सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे वैमानिकाने विमानाला सुमारे सव्वा तास हवेत घिरट्या घालाव्या लागल्या. मुंबईत लँडिंगसाठी परिस्थिती अनुकूल नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हे…

Read More

दिल्ली बस सामूहिक बलात्कार प्रकरण- 398 पानांचे आरोपपत्र दाखल:वीर्याचे नमुने आणि केसांचे पुरावे मिळाले

दिल्ली पोलिसांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच्या स्लीपर बसमधील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात 398 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बसमधून काही पुरावे मिळाले होते. त्यात वीर्याचे नमुने आणि केसांचा समावेश आहे. आरोपपत्रात पोलिस कर्मचारी, डॉक्टर आणि इतरांसह 10 साक्षीदारांचे जबाब आहेत. आरोपपत्र 18 सप्टेंबर रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले होते आणि 24 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्याची…

Read More

दुष्काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी फिरकू नका:बावनकुळेंचे बँका-पतसंस्थांना सक्त निर्देश

राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. महसूलमंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पाणीटंचाई, चारा उपलब्धता, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि कर्जवसुलीचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश…

Read More

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील 10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी:फेब्रुवारी-मार्च 2027 च्या परीक्षेसाठी शुल्क न घेण्याचे राज्य मंडळाचे निर्देश

राज्यातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षेसाठी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क घेऊ नये, अशा सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना…

Read More

ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार:दोन राऊंड फायर, प्रकृती चिंताजनक

ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. गोळीबाराची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी…

Read More

जिल्हा बँकेच्या बैठकीला निलेश लंके यांना निमंत्रण नाही:बाळासाहेब थोरातांच्या बैठकीवर खासदार नाराज, म्हणाले ‘मला बोलवायला हवे होते’

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांची संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने त्यांनी…

Read More

देशात पहिल्यांदाच झऱ्यांची गणना:10 राज्यांमध्ये 14,468 झरे; मणिपूरमध्ये सर्वाधिक, याच ठिकाणी 1336 झरे धोक्यात

देशातील पहिल्या स्प्रिंग सेन्ससच्या दुसऱ्या टप्प्यात 10 राज्यांमधील 14,468 झऱ्यांची गणना करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक झरे मणिपूर आणि महाराष्ट्रात आढळले आहेत. जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशातील सुमारे 15% लोकसंख्या म्हणजेच जवळपास 20 कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हा अहवाल 25 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे झालेल्या 9व्या इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक…

Read More

सातारा जिल्हा बँकेच्या आखाड्यात 27 अर्ज:उदयनराजेंच्या उमेदवारीने राजकीय समीकरणांना वेग, गृहनिर्माण-दूध मतदारसंघ चर्चेत

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा आता प्रत्यक्ष आकार घेऊ लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी विविध मतदारसंघांतून एकूण 27 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. काही इच्छुकांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने नामनिर्देशनपत्रांची संख्या वाढली असून, प्रत्यक्ष 21 उमेदवारी नोंदी निवडणूक प्रक्रियेत आल्या आहेत. त्यामुळे अर्ज छाननी आणि माघारीपूर्वीच विविध मतदारसंघांतील संभाव्य लढतींची…

Read More

लग्नाचे आमिष दाखवून 20 लाखांची फसवणूक:7 जण ताब्यात, दुबई हवाला कनेक्शनची शक्यता; 18.45 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूरमध्ये गुन्हे शाखा युनिट-३ आणि सायबर पथकाने आंतरराज्यीय टोळीतील सात जणांना ताब्यात घेतले. या टोळीने लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २० लाख रुपयांची फसवणूक केली. दुबईतील हवाल्याशी या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून १८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read More