Headlines

कौतुकाची थाप:डोणगाव जि.प. शाळेच्या विद्यार्थिनी वंदना तांबेची महसूल सहायक, तर उज्ज्वला तांबेची आयकर निरीक्षकपदी निवड

पाचोड जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी कुमारी वंदना बाबासाहेब तांबे महसूल सहायक, उज्ज्वला तातेराव तांबे हिची आयकर निरीक्षक तर दिपक पांडुरंग तांबे यांची मेडिकल रेडिओलॅाजी व इमेजींग टेक्निशियन म्हणून निवड झाली. या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिन्ही विद्यार्थ्यांचा…

Read More

सुप्रीम कोर्टात 3 महिला जज होऊ शकतात:गुजरात हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या नावाची शिफारस, सध्या फक्त दोन

सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या लवकरच तीन होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्यासोबत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्या नावांचीही शिफारस करण्यात आली आहे. कॉलेजियमने २८ सप्टेंबर…

Read More

गंगापूर तालुक्यात दुष्काळामुळे बांधावर काँग्रेसकडून पीक पाहणी:खासदार कल्याण काळे यांनी तहसीलदारांना दिले 10 मागण्यांचे निवेदन‎

तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेल्याने दुष्काळाचे संकट गहिरे झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील तुर्काबाद, मलकापूर, शिरोडी आणि डोमेगाव परिसरात खासदार डॉ. कल्याणराव काळे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पिकांनी पाहणी करुन तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले. तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड पाटील यांच्या पुढाकाराने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधी…

Read More

दुष्काळ जाहीर, प्रत्यक्षात मदत कधी, 75 हजार हेक्टरवरील पिके करपली:पावसाच्या खंडामुळे विविध पिकांच्या उत्पादनाला 50 टक्के फटका‎

पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पैठण तालुक्यातील खरीप हंगामातील ७५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, मका यांसह विविध पिकांच्या उत्पादनाला ५० टक्के फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे श . जून ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पैठण तालुक्यात सरासरी ४७१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ३५७ मिलिमीटर पावसाची…

Read More

मुरमा येथे आ. भुमरे यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी:नुकसानीचे पंचनामे करण्याचे आ. भुमरेंचे आदेश‎

पाचोड पावसाने मारलेल्या ५० दिवसांच्या खंडामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार संदीपान भुमरे आणि पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे यांनी (दि. २४) मुरमा व लिंबगाव येथे दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. “येथील एकही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहता कामा नये,’ असे स्पष्ट करत पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे…

Read More

भाजप संसदीय मंडळातील अर्ध्या सदस्यांवर टांगती तलवार:येडियुरप्पा, जटियांची होणार हकालपट्टी, दोघांचेही वय 80 च्या वर

भाजपमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांची, राज्य प्रभारींची आणि संघटन मंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता संसदीय मंडळ, केंद्रीय निवडणूक समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांच्या नावांची घोषणा होणे बाकी आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाशी संबंधित निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च संस्था संसदीय मंडळाच्या स्थापनेची प्राथमिक प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पितृपक्षानंतर ऑक्टोबरमध्ये याची घोषणा केली जाईल. १२ सदस्यीय संसदीय…

Read More

चांदवडचा समावेश ‘दुष्काळ ट्रिगर-1’मध्ये करा:बाधीत शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार मदत जाहीर करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी‎

खरीप हंगाम २०२६ मधील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ‘ट्रिगर-१’ यादीत तातडीने समावेश करावा, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील तहसीलसमोर घोषणाबाजी करत तहसीलदार . नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, देवळा व येवला या १० तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, चांदवड…

Read More

वरठाण तलावाच्या सांडव्यास भगदाड; दररोज लाखो लिटर पाणी जातेय वाया:गळतीमुळे सात फुटांनी पाणीपातळी घटली; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष‎

सोयगाव22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोयगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असतानाच वरठाण लघु प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीला ठिकठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. यंदा शंभर टक्के भरलेला हा तलाव सध्या गळतीमुळे सात फुटांनी रिकामा झा Source link

Read More

खंडित वीजपुरवठ्याविरोधात कन्नड महावितरण कार्यालयासमोर निदर्शने:दुष्काळाच्या झळा, त्यात खंडित वीजपुरवठा‎

तालुक्यात आधीच दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असताना, त्यातच महावितरणकडून होणाऱ्या अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. या गलथान कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कन्नड येथील महावितरण उपविभागीय कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपविभागीय अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देऊन प्रशासनाचा अनोखा निषेध नोंदवला. तालुक्यात यंदा सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी…

Read More

शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही:खासदार कल्याण काळे यांचा प्रशासनाला इशारा‎

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ हेक्टरी एक लाख रुपयांची सरसगट मदत जाहीर करावी. अन्यथा, सत्ताधारी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिला. तालुक्यातील रेलगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. पाहणीनंतर खासदार काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसील प्रशासनाला…

Read More