राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच!:कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा, विदर्भ-मराठवाड्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज
महाराष्ट्रामध्ये परतीच्या मान्सूनचा प्रभाव अजूनही कायम असून, राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने कडक ऊन पडत आहे, तर काही भागांत पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार झाले आहे. आज, ३० सप्टेंबर रोजी हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा…