मनोज जरांगे पाटलांनी अखेर डिफेंडर कार परत केली:अंतरवालीत पोहोचताच मालकाला फोन, नेमकं काय म्हणाले?
अंतरवाली सराटी येथील उपोषणानंतर प्रकृतीच्या कारणामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर जरांगे पाटील थेट अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामस्थ आणि मराठा बांधवांशी संवाद साधला. याचदरम्यान त्यांच्या वापरातील चर्चेतील पांढऱ्या रंगाची डिफेंडर कार अखेर मालकाकडे परत करण्यात आली. मनोज जरांगे…