अखेर एक महिन्यानंतर ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन मागे:अतिरिक्त सीईओंची मध्यस्थी; प्रशासकीय कामाला गती येणार
हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नावर मागील एक महिन्यापासून सुरू असलेले असहकार आंदोलन अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या मध्यस्थीने मंगळवारी (ता. २९) मागे घेण्यात आले. त्यामुळे आता ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये तसेच प्रशासकीय माहिती उपलब्ध करून देण्याच्या कामात गती येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचे चुकीच्या पध्दतीने केलेले निलंबन रद्द करावे, वेतनवाढ रोखण्याची…