बारामतीत दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या:घराच्या ओसरीत झोपलेल्या असताना मध्यरात्री हल्ला; दागिने लुटल्याचा पोलिसांचा अंदाज
बारामती तालुक्यातील शेरेवाडी (बाबुर्डी) गावात घराबाहेरील ओसरीत झोपलेल्या दोन वृद्ध महिलांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. इंदुमती मारुती लडकत (७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (६५) अशी मृत महिलांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लुटण्यात आल्याचे समोर आल्याने चोरीच्या…