साखरेला 50 रुपये हमीभाव द्या!:केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर राजू शेट्टींच्या नेतृत्वात महाराष्ट्र-कर्नाटकातील ऊस उत्पादकांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू
आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील शेतकरी संघटनांनी आज (29 सप्टेंबर) कर्नाटकातील हुबळी येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाबाहेर अभूतपूर्व असे बेमुदत धरणे आंदोलन…