कळमनुरीत अवैध सावकारीच्या संशयावरून एका घरावर छापा:3 बाँण्डसह एक शपथपत्र सापडले, जिल्हा उपनिबंधक फुपाटेंच्या पथकाची कारवाई
कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागात सहकार विभागाचा पथकाने मंगळवारी ता. 29 सकाळी एका घरावर छापा टाकून तपासणी केली. यामध्ये तीन बाँण्ड सह एक शपथपत्र सापडले असून सदर कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागातील किरण वंटनकर हे सावकारी करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक…