Headlines

सेन्सेक्स 600 अंक घसरला, 72100 वर व्यवहार सुरू:निफ्टीतही 200 अंकांची घसरण, सलग 8 व्या आठवड्यात घसरण सुरू

शेअर बाजारात आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी सलग आठव्या आठवड्यात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 600 अंकांहून अधिक घसरणीसह 72,100च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची घसरण झाली असून तो 22,600वर आला आहे. ऑटो, मेटल आणि मीडिया शेअर्समध्ये आज अधिक विक्रीचा दबाव आहे. आज 4 IPO मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी रनवाल एंटरप्रायझेस, जर्मन ग्रीन स्टील…

Read More

जागतिक हृद्यरोग दिनानिमित्त दिव्य मराठी टॉक शो:ॲसिडिटी समजून छातीतील दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, ईसीजी काढल्यास समजेल आजार

छातीत दुखत असल्यास ती केवळ ‘ॲसिडिटी’ आहे, असा स्वतःच अंदाज लावून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यानंतर घरीच औषधे घेणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे अनेकदा हृदयाच्या आजाराला ॲसिडिटीचे दुखणे समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच जवळच्या रुग्णालयात जाऊन ईसीजी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्ला हृदयतज्ज्ञांनी जागतिक हृदयरोग दिनानिमित्त दिला. उपचाराचा पर्याय निवडण्यात विलंब ठरतोय घातक हार्ट अटॅकच्या…

Read More

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला वरुणराजाचा दिलासा?:4-5 दिवसांत परतीचा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता; कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार सरींचा इशारा

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने महाराष्ट्रातील 75 टक्के भागावर कोरड्या दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असतानाच, हवामान खात्याने राज्यातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी दिली आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कर्नाटक ते तामिळनाडूदरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत…

Read More

शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन- ॲड. शिंदे:आजच्या युवकांनी कौशल्याधिष्ठीत शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास साधण्याची गरज- पवार‎

सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणजे शिक्षण होय. याची आत्मजाणीव कर्मवीरांना होती म्हणूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण कर्मवीरांमुळेच झाली. कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे वारसदार होते. आजचे रयतमधील शिक्षक हे कर्मवीरांचा विचार वारसा जोपासत आहेत. रयत शिक्षण संस्था ही काळाबरोबर बदलणारी संस्था आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे…

Read More

युवा शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहावे- आमदार लहामटे:अकोले बाजार समितीची वार्षिक सभा उत्साहात, मका खरेदी केंद्र सुरू करणार‎

कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करण्यासाठी सरकारकडून २ ते अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे माझे प्रयत्न आहेत. यातून समितीचे संपूर्ण आवार चकाचक करण्यात येईल. सरकारकडून दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचे लाभ मिळतील असे होण्याआधीच मुबलक पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे, असे भावनिक उद्गार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले. शेतकरी…

Read More

जेष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे बार्शीमध्ये परखड मत‎:भाजपने भ्रष्ट राजवट अंगिकारल्यास त्यांचा काँग्रेस व्हायला जास्त वेळ लागणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, आरएसएसचे नियोजनबध्द प्रयत्न, देशभरात केलेला हिंदुत्ववादाचा अवलंब यामुळे येत्या ३० वर्षात भाजपा सत्तेतून हटणार नाही परंतु, भाजपाने काँग्रेसप्रमाणेच भ्रष्ट राजवट अंगिकारली तर देशभरात भाजपाची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, असे परखड मत जेष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. येथील वीरशैव विदया संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेत पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी यांनी…

Read More

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात:क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हल्लाबोल आंदोलन‎

यंदाच्या अल्प पावसामुळे अमरावतीसह राज्याच्या विविध भागात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाचे कोणतेही साधन उरलेले नाही. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी एसडीओ अनिल भटकर यांच्या कार्यालयासमोर ‘हल्लाबोल आंदोलन’ करण्यात आले….

Read More

आंदोलन:राष्ट्रसंतांना भारतरत्न सन्मान द्यावा, गुरुदेवभक्तांचे कलेक्ट्रेटवर धरणे, संत गाडगे महाराज यांच्या समाधीस्थळापासून मोर्चाला सुरुवात‎

“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…’ असा खंजिरीच्या तालावर विश्वाला मानवतेचा आणि ग्रामविकासाचा संदेश देणारे युगपुरुष, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करण्यात यावा, या मागणीसाठी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातील अनेक गुरुदेवभक्तांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा समितीच्या पुढाकाराने त्यासाठी शहरात…

Read More

राज्य विश्वस्त महापरिषदेच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यात मंदिर विश्वस्तांची बैठक:संघटन अधिक सक्षम करण्याबाबत बैठकीत करण्यात आली सविस्तर चर्चा‎

महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जिल्हा शाखेच्यावतीने आगामी ३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय विश्वस्त महापरिषदेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मंदिर विश्वस्त व पदाधिकाऱ्यांची बैठक येथील श्री समर्थ सोटागीर महाराज संस्थान येथे पार पडली. . मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन, देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण, पारदर्शक व्यवस्थापन तसेच मंदिर विश्वस्तांचे संघटन अधिक सक्षम करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत तिवसा…

Read More

शेतकऱ्याला प्रत्यक्षात काय मि‌ळाले, विचारत शिवसैनिक जिल्हा कचेरीत:खासदार सावंत, आमदार देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्चा‎

राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय मिळाले, असे विचारत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी २८ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. खासदार अरविंद सावंत आणि आमदार नितीन देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यात एक पोलिस कर्मचारी किरकोळ…

Read More