Headlines

एमपीएससीने राज्यसेवा मुख्यपरीक्षेसह 3 परीक्षा पुढे ढकलल्या:2025 च्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ३ मुख्य परीक्षा स्थगित केल्या आहेत. नव्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि आयोगाच्या परीक्षा पद्धतीवरून उमेदवारांनी केलेल्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्यसेवा २०२६ ची मुख्य परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. मात्र विद्यार्थी, पालक, संघटना आणि काही लोकप्रतिनिधींनी ती पुढे ढकलण्याची मागणी केली होती….

Read More

पाणीटंचाईमुळे साडेतीनशे तरुणांचे विवाह रखडले:शेवटी हताश ग्रामस्थांनी ‘तुळशी गाव विकणे आहे, किंमत- फक्त पाणी’, असे फलक लावत केला प्रशासनाचा निषेध

महाराष्ट्रातील माढा तालुक्यातील तुळशी गाव सध्या एका विदारक समस्येशी झुंजत आहे. पाण्याचा भीषण दुष्काळ केवळ शेतीवरच नाही, तर इथल्या तरुणांच्या संसारावरही उठला आहे. गावात पाण्याचा थेंब नसल्याने, कुणीही बाप आपली मुलगी इथल्या तरुणांना द्यायला तयार नाही. परिणामी, गावातील तब्बल साडेतीनशे तरुणांचे विवाह रखडले आहेत. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आणि सर्व मार्गांनी आंदोलने करूनही पाणी मिळत नसल्याने,…

Read More

दिल्लीच्या जजचे रेप पीडितेला खास पत्र:म्हणाले- तुझे बालपण परत देऊ शकत नाही, पण धैर्य लक्षात ठेवणार; दोषी कधीच सुटणार नाही

दिल्लीतील ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीश रजनी रंगा यांनी 10 वर्षीय बलात्कारपीडित मुलीसाठी निकाल सुनावल्यानंतर एक खास पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी मुलीला विश्वास दिला की, न्यायालयाने तिचे म्हणणे ऐकले आहे. ज्या व्यक्तीने तिला इजा पोहोचवली, तो आता पुन्हा कधीही तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने आता हे पत्र मुलीपर्यंत किंवा तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले…

Read More

पती, दोन मुलांच्या मृत्यूनंतर‎ शिक्षिकेने केली आत्महत्या‎:नांदेडला दोन दिवसांपूर्वी गळफास घेण्याचा प्रयत्न‎

पती आणि दोन मुलांच्या मृत्यूच्या ‎‎‎घटनेनंतर ‎‎मानसिक धक्का ‎‎‎बसलेल्या ‎‎शिक्षिकेने राहत्या ‎‎‎घरी २६‎‎सप्टेंबरला‎‎ गळफास घेऊन ‎‎‎आत्महत्या ‎‎करण्याचा प्रयत्न‎ केला. या घटनेनंतर गंभीर जखमी‎ झालेल्या शिक्षिकेवर नांदेडमध्ये‎ उपचार सुरु होते. सोमवारी‎ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎ ही घटना नांदेड शहरातील सांगवी ‎भागातील गोपाळनगर येथे घडली.‎ध म्मशिला मोरे असे मृत‎ शिक्षिकेचे नाव आहे.‎ भोकर तालुक्यातील बेंबर‎ येथील मूळ…

Read More

संकटात भर:कऱ्हाडी धरण कोरडेठाक, लाडसावंगीसह परिसरातील पाणीप्रश्न गंभीर; ग्रामस्थांचा पदाधिकाऱ्यांविरुध्द रोष

या वर्षी पावसाळ्यात अपेक्षित पाऊसच न पडल्यामुळे दुधना नदीला एकही पूर नाही व परिसरातील सर्वच पाठ बंधारे कोरडे आणि लाडसावंगी परिसराला दिलासा देणारे कऱ्हाडी धरण पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे. धरणात एका टक्क्यानेही पाणीसाठा वाढलेला नसल्याने लाडसावंगीसह परिसरातील चार गावांवर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवल्याचे चित्र आहे. आहे. जलजीवन मिशनचे सोमठाणा येथून येणारे पाणी अजूनही पुढाऱ्यांच्या…

Read More

शेतकरी हिताला प्राधान्य- चेअरमन भुमरे:रेणुकादेवी शरद कारखान्याच्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची उत्साहात सांगता‎

श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना लि., रेणुका नगरच्या २५ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२७ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी कारखान्याचे चेअरमन विलास संदीपान भुमरे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी कारखान्याच्या मागील वाटचालीचा आढावा घेताना चेअरमन विलास भुमरे यांनी कारखान्याच्या अडचणीच्या काळात सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ,…

Read More

सटाणा बाजार समिती प्रशासकीय इमारतीला अजित पवारांचे नाव:नामकरणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून संचालक मंडळाचा सत्कार‎

येथील बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला ‘लोकनेते अजितदादा पवार प्रशासकीय इमारत’ असे नामकरण करण्याचा ठराव बाजार समितीच्या वतीने करण्यात आला. या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते बाजार समितीच्या सभापती सिंधुताई सोनवणे, उपसभापती हरीभाऊ जाधव व संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

Read More

शासनाच्या धोरणाचा निषेध:चांदवडला दुष्काळी यादीतून वगळल्याने‎ तहसीलदारांना करपलेली पिके देत ठिय्या‎

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ‘ट्रिगर-१’ यादीतून चांदवडला वगळल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. या अन्यायाविरोधात सोमवारी सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना व शेकडो बळीराजांनी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांना करपलेली पिके आणि ‘गाजर’ देत रोष व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही व शेजारील तालुक्यांचा समावेश झालेला असताना, कायमस्वरूपी दुष्काळाच्या छायेत असलेल्या चांदवडवरच…

Read More

ठाणगावी भोर विद्यालयात शिक्षक, गुणवंतांचा गौरव:कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रथ मिरवणुकीसह विविध पथकांचे सादरीकरण‎

येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. . अध्यक्षस्थानी नाशिक मनपाचे मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल मच्छिंद्र शिरसाट, इंजि. मुकुंद काकड, मुंबईचे नगरसेवक प्रकाश जंगधरे, श्याम वालझाडे, नयन केदार, सुजलान कंपनीचे संदीप कोल्हे,…

Read More

यूपीत 8 नद्या धोक्याच्या पातळीवर:17 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; बिहारमध्ये बगहा-चंपारण बंधारा फुटला, राजस्थानात गारपीट

उत्तर प्रदेशात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे ८ नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. नेपाळमधून पाणी सोडल्यानंतर कुशीनगरमध्ये गंडक (नारायणी) नदीला पूर आला आहे. २ गावांतील १,४०० कुटुंबे बाधित झाली आहेत. ६०० कुटुंबे घर सोडून बंधाऱ्यावर राहत आहेत. आज राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमध्ये सोमवारी रात्री बगहा-१ ब्लॉकमधील…

Read More