महिला सक्षमीकरणासाठी शेतीपूरक उद्योगांना चालना:‘सम्यक गती महिला शेतकरी’च्या सभेत निर्णय
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सम्यक गती महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, घोटी प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांना बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग व लघुउद्योगांना चालना देण्याचा निर्धार करण्यात आला. सभेला घोटी प्रभाग संघातील सुमारे ५०० महिला सभासद उपस्थित होत्या. इगतपुरी तालुका आदिवासीबहुल असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना…