शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने शिवसैनिक जिल्हाकचेरीत घुसले:खासदार सावंत, आमदार देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्चा, एक पोलिस जखमी
अमरावती: राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळाली नाही, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. खासदार अरविंद सावंत आणि आमदार नितीन देशमुख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेट तोडून जिल्हा कचेरीत घुसण्याचा प्रयत्न केला. यात एक पोलिस…