करचुकवेगिरीच्या संशयावरून ‘पॅनोरमा’, भगनानी कुटुंबावर ‘आयकर’चे छापे:रकुल प्रीत व वासू भगनानींच्या मुंबईतील निवासस्थानांवर छापे
चित्रपट निर्मितीच्या नावाखाली परदेशात कथितरीत्या कोट्यवधी रुपयांचा निधी वळवणे आणि मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरून आयकर विभागाने बॉलीवूडवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईतील तब्बल १२ ठिकाणांवर आयकर विभागाच्या विविध पथकांनी एकाच वेळी शोधमोहीम राबवली. या कारवाईच्या केंद्रस्थानी चित्रपट निर्माता वासू भगनानी, रकुल प्रीत सिंग आणि पॅनोरमा स्टुडिओशी संबंधित आस्थापने आहेत. मुंबई आयकर…