ज्ञानेश कुमारांच्या भूमिकेवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक:गाढवावर बसवून प्रतिकात्मक धिंड, जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी
निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर गेल्या 10 महिन्यांत किमान 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात पक्षाचे…