गरवारे महाविद्यालयातील वाचन कक्षाला प्रा. द. मा. मिरासदार यांचे नाव:माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, 'मिरासदार यांनीच आम्हाला बहुश्रुतता दिली'
द. मा. मिरासदार हे खूप अभ्यासू आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. त्यांची प्रसन्नता चेहऱ्यावर आणि बोलण्यात दिसायची. मिरासदार आणि गरवारे महाविद्यालयातील शिक्षकांनीच आम्हाला बहुश्रुतता देत घडवले. महाविद्यालयातूनच वाचन आणि चर्चा करण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे द. मा. मिरासदार यांच्या आठवणी फक्त जन्मशताब्दी वर्षातच नाही, तर पुढेही जपल्या जातील, असे गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय…