पुण्याच्या उरुळी देवाचीमध्ये कापड दुकानात चोरी:खिडकीचे गज उचकटून पाऊणपाच लाख लंपास
वस्त्रदालनाच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील चार लाख 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वस्त्रदालनाच्या मालकांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात नवल टेक्सटाईल मार्केट हे वस्त्रदालन आहे. वस्त्रदालनाच्या मागील बाजूस…