वसमतमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्याप्रकरणी 55 जणांवर गुन्हा दाखल:वाखारीत जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, ग्रामपंचायतीचे सीसीटीव्हीही हटवले
वसमत तालुक्यातील वाखारी येथे अनाधिकृतरित्या महापुरुषांचा पुतळा उभारून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 55 जणांवर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यात गुरुवारी ता. 23 गुन्हा दाखल झाला आहे. यावे्ळी जमावाने ग्रामपंचायतकडून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही काढून घेतल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वाखारी येथे गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बाजूला शासकीय जागेवर अतिक्रमण…