लातूरमध्ये सावकारी पाश:मित्राच्या दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची शेती, निलंग्यात अनेकांवर गाव सोडण्याची वेळ
एका चुकीच्या निर्णयाने आणि माणुसकीपोटी घेतलेल्या जामीनदारीने एका शेतकऱ्याचे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याचे विदारक वास्तव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ‘नणंद’ गावातून समोर आले आहे. गेल्या चार वर्षांपासून गावातील भोसले कुटुंब खासगी सावकाराच्या अशा चक्रव्यूहात अडकले आहे की, त्यांना त्यांची पाच एकर शेती गमवावी लागली आणि तरीही सावकाराचा ‘कर्जाचा तगादा’…