चित्ते नदी पुनरुज्जीवन: ग्रामविकास संस्थेला जलभूषण पुरस्कार:मराठवाड्यातील 27 गावे दुष्काळमुक्त केल्याने गौरव
ग्रामविकास संस्थेला चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानासाठी महाराष्ट्र शासनाचा 2022 चा द्वितीय जलभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील मृतप्राय चित्ते नदीला पुनरुज्जीवित करून संस्थेने 27 गावे कायमची दुष्काळमुक्त केली आहेत, ज्यामुळे 15,000 ग्रामस्थांच्या जीवनात जलसमृद्धी आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला…