बसस्थानकाजवळ 200 मीटर नियमाचे उल्लंघन:खाजगी वाहतूक सर्रास सुरू, परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही अमरावतीत परिस्थिती 'जैसे थे'
अमरावती येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खाजगी वाहतूक सुरू असून, यामुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) मोठा आर्थिक फटका बसत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकारात संगनमत असल्याचा आरोप प्रवासी आणि जागरूक संघटनांकडून केला जात आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवाशांची पळवापळवी सुरू…