Headlines

अचलपूरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य:मुस्लिम संघटनांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

अचलपूरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी मुस्लिम संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी अयान अहमद तनवीर अहमद आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अचलपूरचे काजी ग्यासूद्दीन यांच्या नेतृत्वाखाली विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांना निवेदन सादर केले. संघटनांच्या मते,…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावतीत विविध कार्यक्रम:इर्विन चौकात पहाटेपासून रात्रीपर्यंत अनुयायांची अलोट गर्दी, मान्यवरांची उपस्थिती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिल रोजी येथील इर्विन चौक विविध कार्यक्रमांनी दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात हजारो नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. गेल्या पंधरा वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे या मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यांतर्गत सकाळच्या सत्रात ज्येष्ठ…

Read More

भारत-अमेरिका कराराविरोधात शेतकरी, मजूर, कामगारांचे आंदोलन:किसान सभेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आणि कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या आयटकच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भारताने अमेरिकेसोबत केलेला ‘ट्रेड डील’ कृषी व व्यापारविषयक करार शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी घातक असल्याने तो रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात…

Read More

टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांची आता खैर नाही:तहसीलदारच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही बसवा; ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, मंत्री बावनकुळेंचे आदेश

“प्रशासनाचे काम केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे. एखादी आलिशान प्रशासकीय इमारत उभी राहिली म्हणजे प्रशासन लोकाभिमुख झाले असे होत नाही. जर नवीन इमारतीतही टेबलाखालून पैसे घेण्याचे प्रकार थांबणार नसतील, तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि त्याचे थेट संचलन (सर्व्हिलन्स) जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरशी जोडा,” अशा कडक शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read More

स्थळपाहणी करून अहवाल सादर करा:विभागीय आयुक्तांचे निर्देश, लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश

विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी दिले आहेत. संबंधित अर्जदारांना केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश अप्पर आयुक्तांनी दिले. सोमवारी…

Read More

अमरावतीत 876 लखपती थकबाकीदारांची नावे जाहीर:मनपाने पहिल्यांदाच प्रसिद्ध केली यादी, रक्कम भरण्याचे आवाहन

अमरावती महानगरपालिकेने एक लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असलेल्या ८७६ मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असून, थकबाकीदारांना तातडीने रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही यादी झोन क्र. १ ते ५ मधील संपूर्ण शहरातील मालमत्तांची आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पालिकेच्या महसुलात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे….

Read More

NSA डोवाल म्हणाले- युद्धाचा उद्देश शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणे:देशाची सुरक्षा फक्त लष्कराच्या ताकदीने ठरत नाही, जनतेची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशाची सुरक्षा केवळ त्याच्या लष्करी सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर जनतेची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची असते. देशाची ताकद मोजताना लोकांच्या मनोबलाकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी चूक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या (RRU) पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना डोवाल म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा हा…

Read More

वनोजा बागेतील सोलर प्लांटला आग; कोट्यवधींचे नुकसान:आगीचे कारण अज्ञात, पोलिस तपास सुरू

अंजनगाव सुर्जी परिसरातील वनोजा बाग येथील सोलर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सोलर प्लेट्स जळून खाक झाल्या असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मजुरांनी सुरुवातीला आग विझवण्याचा…

Read More

महिलेची तिडीक:‘माझा वापर केला’ म्हणत आधी 5 दगडांनी ठेचले; थंड डोक्याने केले कोयत्याने 8 वार, नाशिकमधील घटना

विल्होळीत हायवेलगत एका महिलने साथीदाराच्या मदतीने जुन्या नाशिकमधील कुंभारवाड्यातील सुरज सोळंकी (37) यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्याला 5 दगडांनी ठेचले. संतापाची तिडीक डोक्यात असलेल्या या महिलेने बॅगेतून कोयता आणत त्याच्या डोक्यावर 8 वार केले. सोमवारी (दि. 13) दुपारी 4.30 वाजताचा हा थरार एक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद करत पोलिस पाटलांना कळविल्यानंतर घटना उघडकीस आली. गंभीर…

Read More

देवाभाऊ काय चाललंय तुमचं?:1 किमी रस्त्याला 254 कोटी कशासाठी लागतात? शक्तीपीठवरून राजू शेट्टींचा फडणवीसांना सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव अंतरावरून आणि त्यापोटी फुगलेल्या हजारो कोटींच्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले आहे. “देवाभाऊ, फोंड्या माळावर १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का?”असा सवाल राजू शेट्टी यांनी केला असून, या प्रकल्पातून ७० हजार कोटींचा ‘ढपला’…

Read More