Headlines

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचं मोठं विधान:'महात्मा गांधींनी उपवासाचं आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद'

भाजप नेते, उद्योजक आणि विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले अरुण लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधींशी करत केलेल्या विधानामुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असलेल्या लखाणी यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गांधीजींसारखेच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचा दावा केला….

Read More

महिला आयोगाची प्रणित मोरे – हिमांशु जांगडाला नोटीस:सेजल पवारच्या कमेंट्सवर AIMSA ची कारवाईची मागणी; तिघांवर FIR

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) गुरुग्राममध्ये झालेल्या कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टँड-अप कॉमेडी शोशी संबंधित वादाची स्वतःहून दखल घेतली आहे. ‘370 की बिर्याणी’ व्हिडिओ प्रकरणी आयोगाने प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांना सुनावणीची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 जून रोजी सायंकाळी 4 वाजता आयोगासमोर निश्चित करण्यात आली आहे. न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, NCW ने म्हटले…

Read More

वैरागच्या व्हाय नॉट एकांकिकेचा विशेष गौरव:आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनात वैरागच्या ”साई आयुर्वेद”चा डंका‎

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात वैऱागच्या साई आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “व्हाय नॉट” या एकांकिकेचा विशेष गौरव करण्यात आला. स्पंदन २०२६ या विद्यापीठस्तरीय सांस . नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे पद्मश्री चैत्राम देवचंद पवार, सन्माननीय अतिथी पद्मश्री पोपटराव बागुजी पवार, विभागीय आयुक्त डॉ….

Read More

'काँग्रेस ही बुडती नाव, राष्ट्रवादी त्यात का विलीन होईल?:सध्या भाजप हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम 'चॉईस'- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात. काही तरी चर्चा असते पण त्यामध्ये काही तथ्य नसते. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का…

Read More

'मदतीचा' फज्जा!:लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल निघाला आजारी; रोहित पवार-वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, प्रशासनाकडून बैल बदलण्याची तयारी

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या मदतीसाठी शासनाने दिलेला बैलच आजारी निघाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्नीला नांगराला जुंपून शेतीची मशागत करणाऱ्या या शेतकरी दांपत्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आल्यानंतर प्रशासनाने तातडीने मदत म्हणून बैल उपलब्ध करून दिला होता. मात्र, हा बैल दोनच दिवसांत आजारी पडल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू…

Read More

अमेरिकन हल्ल्यात ठार झालेल्या आदित्यच्या मृतदेहाची प्रतीक्षा:काल संध्याकाळपर्यंत जहाजातच होती बॉडी; कुटुंबीयांना अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही

अमेरिकन हल्ल्यात प्राण गमावलेल्या हमीरपूर जिल्ह्यातील भालू गावचा रहिवासी असलेल्या 23 वर्षीय मर्चंट नेव्ही कॅडेट आदित्य शर्माचे कुटुंबीय मुलाचा मृतदेह घरी पोहोचण्याची वाट पाहत आहे. आदित्यचे काका संजीव लखनपाल यांनी सांगितले की, मुलाचा मृतदेह कधी मायदेशी आणला जाईल, याची स्पष्ट माहिती त्यांना अद्याप मिळालेली नाही. संजीव लखनपाल यांनी सांगितले की, काल संध्याकाळपर्यंत आदित्यचा मृतदेह जहाजातच…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई:70 हजारांची लाच स्वीकारताना अभियंत्याच्या लाचलुचपत विभागाने आवळल्या मुसक्या

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षकाला 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. उमेश अरुण लोंढे (वय 28, रा. रहाटणी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-3) अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात 58 वर्षीय तक्रारदाराने…

Read More

'काला हिरण' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज:सलमान खान आणि लॉरेन्सचा नाव बदलून उल्लेख करण्यात आला; पाहा व्हिडिओ

सलमान खानच्या बहुचर्चित काळवीट प्रकरणावर आधारित ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला व्हिडिओ शुक्रवारी प्रदर्शित झाला. ज्यात सलमान खानचा उल्लेख अयान खान आणि लॉरेन्सचा उल्लेख लॉयन या नावाने करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये काळवीट शिकार प्रकरण आणि कायदेशीर लढाईशी संबंधित प्रकरण दाखवण्यात आले आहे. अनेक संवाद…

Read More

शेअर मार्केटमधील कोट्यवधींच्या तोट्याने संसार उद्ध्वस्त:नंदुरबारमधील मुख्याध्यापकाची 2 चिमुरड्यांसह पत्नीची हत्या करून आत्महत्या

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाने पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीद या मूळ गावी ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही घेतला गळफास मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा…

Read More

पुणे शहरात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा:टंचाईमुळे कार वॉश, स्विमिंग पूलवर निर्बंध; महापालिकेचा निर्णय

यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त झाल्याने पुणे महापालिकेने शहरात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून नागरिकांना वर्षभर पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले…

Read More