नाना पटोलेंना साकोलीत मोठा धक्का:नामनिर्देशनापूर्वीच लाखांदूरचे 4 काँग्रेस नगरसेवक भाजपात, भंडारा-गोंदियात खळबळबळ
महाराष्ट्रात सध्या 17 जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच, भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसला अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघांतर्गत लाखांदूर नगरपंचायतीच्या तीन विद्यमान नगरसेविका आणि एका स्वीकृत नगरसेवकाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘रामराम’ ठोकून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे….