Headlines

शेवगावात ऐतिहासिक ३६० वा शिवअभिषेक सोहळा उत्साहात:सरसेनापतींचे वंशज संतोषकुमार दहातोंडे यांच्या हस्ते सोहळा; शिवअभिषेक समितीकडून विशेष गौरव‎




प्रतिनिधी | शेवगाव शेवगाव शहरात गेल्या आठ वर्षांपासून अखंडपणे दर शुक्रवारी वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते होणारा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा यंदा ऐतिहासिक ठरला. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे वंशज संतोषकुमार दामोधर दहातोंडे यांच्या हस्ते यंदाचा ३६० वा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा उत्साहात झाला. काही वर्षांपूर्वी इतिहास संशोधनात फारसे परिचित नसलेल्या सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे नाव आणि पराक्रम आज घराघरात पोहोचवण्याचे मोठे श्रेय संतोषकुमार दहातोंडे यांना जाते. त्यांनी ऐतिहासिक व्हिडिओ, पोस्ट, दुर्मिळ चित्रे, रक्तदान शिबिरे, शिवराज्याभिषेक सोहळे, ऐतिहासिक स्थळांना भेटी, सोशल मीडिया आणि विकिपीडियाच्या माध्यमातून सरसेनापतींचा सुवर्ण इतिहास जगासमोर आणला आहे. त्यांच्या याच गौरवशाली कार्याची दखल घेऊन शिवअभिषेक समितीचे चंद्रकांत महाराज लबडे यांनी संतोषकुमार दहातोंडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. सर्व शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब म्हणजे, संतोषकुमार दहातोंडे यांच्या पुढाकारातून आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून शेवगाव परिसरात सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्या नावाने एक भव्य ऐतिहासिक कमान उभारण्यात आली आहे. आज या मार्गावरून ये-जा करणारे लाखो नागरिक ही कमान अभिमानाने पाहत आहेत. अनेक ऐतिहासिक ठिकाणे, शिवसृष्टी, किल्ले, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच शिवभक्तांच्या घरांमध्येही संतोषकुमार दहातोंडे यांनी तयार केलेले सरसेनापतींचे छायाचित्र आणि माहिती लावलेली पाहायला मिळते. याच सोहळ्याचे दुहेरी औचित्य साधत, शेवगाव तालुक्यातील वरूर येथील युवा शिवशाहीर अक्षय डांगरे यांनी रचलेल्या सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्यावरील पहिल्यावाहिल्या पोवाड्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हा ऐतिहासिक पोवाडा लवकरच ‘महाराष्ट्राची यशोगाथा’ या चॅनेलवर शिवभक्तांच्या भेटीस येणार आहे. स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून इतिहास जिवंत ठेवण्याचे हे कार्य अतिशय मोलाचे असल्याचे मत शिवअभिषेक समितीने व्यक्त केले. या सोहळ्यासाठी शेवगाव व परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *