Headlines

तरुणी, महिलांनी स्वरक्षणात सक्षम असणे ही काळाची गरज- डॉ. गोडबोले:‘हर घर दुर्गा'' अभियानांतर्गत शिवकालीन युद्धकलेचे देणार धडे‎

डाबकी रोड, रेणुका नगर येथील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत महिला व तरुणींसाठी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराला रविवारी प्रारंभ झाला. तरुणी, महिलांनी स्वसंरक्षणामध्ये सक्षम असणे ही काळाची गरज आहे, असे मत मुख्य अतिथी डॉ. आरती गोडबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले. केवळ शस्त्र चालवता येणे पुरेसे नसून प्रत्येकीने आपल्यामध्ये हिंमतही जोपासावी. त्यामुळे आपल्याला कोणी…

Read More

भोंदू अशोक खरात आता ईडीच्या ताब्यात:52 कोटींच्या व्यवहारांमागे परदेशात पळून जाण्याचा कट उघड; 65 बनावट खात्यांतून उलाढाल

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात तसेच पतसंस्थेतील संशयित व्यवहारांप्रकरणी अटकेत असलेल्या नामकर्ण आवारे यांना सिन्नर सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एकाच वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आवारे यांच्या वकिलांनी पुढील पोलिस…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचे टँकर न आल्याने 22पेट्रोल पंप पुन्हा ड्राय:नागरिकांनाे, पॅनिक हाेऊन नका, इंधनाचा अतिरिक्त साठा करू नका, दिव्य मराठीचे आवाहन

अमेरिका, इस्रायल आणि इराणसह आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसह सर्वसामान्यांना बसू लागला आहे. शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अचानक घट झाल्याने इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शनिवारी मागणी केलेले टँकर रविवारच्या सुटीमुळे आले नाहीत. साठा संपल्यामुळे शहरातील 22 पेट्रोल पंपासह वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नडमध्ये अनेक पेट्रोल पंप…

Read More

स्रोत स्तरावरील कचरा विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना:बायोमायनिंग, वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा : घनकचरा प्रकल्पाची पाहणी‎

सुकळी कंपोस्ट डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पाची २५० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असून, शहरातून दररोज येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण आणि विलगीकरण बायोमायनिंगद्वारे केले जात असल्याबद्दल माहिती घेण्यात आली. यावेळी मान्यवरांनी ‘स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरण’ या उपक्रमाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. नागरिकांनी घरातूनच ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, जलद…

Read More

नीट पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी:जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. १८ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले की, देशात शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे. नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे २२…

Read More

नीट पेपर प्रकरण:‘आरसीसी’च्या प्रा. मोटेगावकरला सीबीआयकडून अटक, 9 दिवस काेठडी, अटकेची 4 प्रमुख कारणे

नीटची प्रश्नपत्रिका फोडण्यात लातुरातील आरसीसी क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोटेगावकर याचा प्रमुख सहभाग असल्याचे समोर आले आहे. नीट परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका होत्या. त्याच्या हस्तलिखित प्रती विद्यार्थी व इतरांना पुरवल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. परीक्षेनंतर त्याने पुरावे नष्ट केल्याने 17 मे रोजी रात्री त्याला पुण्यातून अटक करण्यात आली. 9 दिवसांची सीबीआय कोठडी…

Read More

सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 75,700 वर:निफ्टीमध्ये 100 अंकांची वाढ, आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

आज म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी सेन्सेक्स ४०० अंकांच्या वाढीसह ७५,७०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १०० अंकांची वाढ झाली आहे, तो २३,७५० च्या पातळीवर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे, तर निफ्टी प्रायव्हेट बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारही संमिश्र व्यवहारासह बंद झाले परदेशी…

Read More

खासदार वर्षा गायकवाडांचे बंधू, काँग्रेसचे मुंबई महासचिव तुषार गायकवाडांचे निधन:गायकवाड कुटुंबावर पुन्हा संकट

मुंबईतील एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू आणि मुंबई काँग्रेसचे महासचिव तुषार एकनाथ गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुषार गायकवाड हे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत एकनाथ गायकवाड यांचे पुत्र होते. गायकवाड कुटुंब हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या…

Read More

मशागतीच्या ऐन हंगामात डिझेलची ‘आग':ट्रॅक्टरचे भाडे 20% वधारले, पारंपरिक शेती कालबाह्य; यांत्रिकीकरणावर भर‎

खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या बोरगाव मंजूसह ग्रामीण भागात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत डिझेल आणि इंधनाच्या दरात झालेली सातत्यपूर्ण वाढ झाल्याने ट्रॅक्टरचे भाडे २० टक्के वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेती कसण्याचा खर्च आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून, ऐन हंगामात इंधन दरवाढीचा मोठा फटका मशागतीच्या कामांना बसत आहे….

Read More

अकोला बाजार समितीत हळदीची आवक सुरू:आठवड्यातून प्रत्येक बुधवारी, शनिवारी होणार लिलाव‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या लिलावात हळदीला क्विंटलमागे १३६०१ रुपयांचा दर मिळाला. शेतकऱ्यांना क्विंटलमागे १०,६०० रुपये ते १३,६०१ रुपयांदरम्यान दर मिळाला. बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या उपस्थितीत लिलावाला सुरुवात झाली. हळदीचे लिलाव सुरू करण्यासाठी अनिल जैन, महावीर जैन, तुषार घुगे आदींनी सहकार्य केले. किशोर सरोदे, दीपक देवकर,…

Read More