Headlines

धनुर्धर यशदीप भोगे, कुमकुम मोहोड भारतीय धनुर्विद्या संघात झाले दाखल:जपान येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड, सर्वत्र कौतुक‎

प्रतिनिधी | अमरावती जपानच्या ऐची-नागोया शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय रिकर्व धनुर्विद्या संघात अमरावतीचे आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे व कुमकुम मोहोड या दोघांचा समावेश झाल्यामुळे शहराच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. यशदीप पुरुष तर कुमकुम महिला संघाची सदस्य आहे. कुमकुमने नुकत्याच चीनमध्ये झालेल्या विश्वचषक…

Read More

ऋषिकेशमध्ये उज्जैनी एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले:शंटिंग करताना झाला अपघात; रात्री उशिरापर्यंत सुरू होते दुरुस्तीचे काम

ऋषिकेशमध्ये सोमवारी रात्री उज्जैनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. अपघातावेळी ट्रेन रिकामी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, डबे रुळावरून घसरताना मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरांतून आणि दुकानांतून बाहेर आले. हा अपघात रात्री सुमारे 9:30 वाजता ऋषिकेश रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खांड गाव परिसरात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, योगनगरी रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या उज्जैनी एक्सप्रेसची…

Read More

गोवंश वाहतुकीवरून 2 गटांत दगडफेक; तीन गुन्ह्यांची नोंद:तिसरी कारवाई: दगडफेक,‎शासकीय कामात अडथळा‎

दर्यापूर,अमरावती दर्यापूर जवळील बाभळी येथे रविवारी (दि. १७) रात्री गोवंश वाहतूक करणारे वाहन अडवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन दगडफेक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारींवरून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या परिस्थिती शांततापूर्ण…

Read More

डी. बी. स्टार एक्स्पाेज:छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या नूतनीकरणात दीरंगाई, खेळाडूंची गैरसोय, दोन वर्षे उलटूनही काम कासवगतीने; 25 कोटी रुपये खर्च

देशासह राज्यात नाशिकच्या खेळाडूंचा डंका वाजणारे मैदान असा नावलौकिक असलेल्या सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान नूतनीकरणाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका या ठिकाणी जिल्हा व राज्य पातळीवर खेळण्यासाठी सराव करणाऱ्या खेळाडूंना बसला आहे. मागील दोन वर्षापासून 25 कोटी रुपये खर्च करून मैदान नूतनीकरणाचा नुसताच गाजावाजा सुरू असून, प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यास…

Read More

नागपूरमधील संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्याला डॉलरमध्ये निधी:पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण, नागपुरात रेकीचा कट

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी केल्याप्रकरणी तपास यंत्रणांसमोर अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुला शेख याला या कामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण कटाची सूत्रे थेट पाकिस्तानात हलवली गेल्याचे तपासातून समोर आले असून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी…

Read More

भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात SC आज निकाल देणार:मागील सुनावणीत म्हटले- मृत्यूसाठी डॉग फीडर्सही जबाबदार, सर्वत्र प्रशासन अपयशी

सर्वोच्च न्यायालय आज भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांशी संबंधित प्रकरणात निकाल देईल. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. मागील सुनावणी २९ जानेवारी रोजी झाली होती, ज्यात खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. यावेळी राज्ये, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि भारतीय प्राणी…

Read More

मंत्र्यांना आदिवासी नागरिकांनी दाखवल्या मेळघाटातील समस्या:डाॅ. उईके यांनी दिले तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मेळघाट दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा गावास सोमवारी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आशेने मंत्र्यांपुढे गावातील गंभीर पाणीटंचाई तसेच खराब झालेल्या रस्त्यांची समस्या मांडत निवेदन सादर केले. तारुबांदा गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, येथील प्रसिद्ध कांदरी बाबा देवस्थानास (क) दर्जा मिळालेला असून, या…

Read More

रातोरात स्टार बनलेल्या जालंधरच्या गायक मस्कीनची कहाणी:एक वर्षापूर्वीच्या रीलमधून ऑफर मिळाली; 1.80 कोटी लोकांनी पाहिलेले 'बुल्लेया वे' गाणे

जालंधरचे रहिवासी अशोक मस्कीन यांचे आयुष्य एका रीलमुळे बदलले. याच रीलमुळे त्यांना अशी ऑफर मिळाली की, फॅक्टरीत लेथ मशीनवर काम करणारे मस्कीन कोक स्टुडिओमध्ये गायलेले ‘बुल्लेया वे और लगदा नीं दिल मर जाणा…’ हे गाणे गाऊन रातोरात स्टार बनले. त्यांनी गायलेले गाणे 1.8 कोटी लोकांनी पाहिले आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांना बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच लाइव्ह शोच्या…

Read More

वर्षातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत मेळघाटातील तेंदूपत्ता हंगाम सुरु:वर्षभराची जमापुंजी गोळा करण्यासाठी आदिवासींचे परिश्रम‎

मेळघाटातील जंगल परिसरात पुन्हा एकदा तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली असून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात जंगलातून तेंदूपत्ता तोडण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराची कमतरता भासत असताना तेंदूपत्ता हंगाम हा अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. जंगलातून पत्ता गोळा करून त्याचे गठ्ठे तयार करण्यात येत असून प्रती नग ३ रुपये ३० पैसे तसेच ३३० रुपये…

Read More

बालपणामध्ये मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात- आचार्य वेरुळकर:माटरगावात बालसंस्कार शिबिराचा समारोप; मान्यवरांचा सहभाग‎

बालपणात मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात. सुसंस्कारित विद्यार्थी हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य असतात, असे मत आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी व्यक्त केले. ते, माटरगाव येथे आयोजित बालसंस्कार शिविर समारोप प्रसंगी बोलत होते. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी माटरगावात मागील अनेक वर्षापासून बालसंस्कर शिबिर घेतल्या जात आहे. नुकतेच प्रारंभ…

Read More