पदासाठी तिसरा मुलगा लपवला; संभाजीनगर एमआयएम नगरसेवकाला अटक:मुलाला दाखवले पुतण्या; नगरसेवक मेहराज खान यांच्यासह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा
महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाइड सर्टिफिकेट तयार करून शासनाची, मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांना अटक करण्यात आली असून, त्याशिवाय नगरसेवकाची पत्नी निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील…