नियोजनाचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करा:प्राप्त निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देणार
चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनाला ६०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्यस्थितीत प्राप्त निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येतील. त्यामुळे यंत्रणांनी जिल्हा नियोजनाचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. महसूल भवनातील बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यांनी सुरुवातीला…