Headlines

मनोज जरांगे सरकारविरोधात पुन्हा मैदानात:16 तारखेला आंतरवाली सराटीतील बैठकीत आंदोलनाची करणार घोषणा; मुख्यमंत्र्यांवर टीका

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी पुन्हा एकदा एक मोठे आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाची तारीख ते 16 मे रोजी आंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत घोषित करणार आहे. या सरकारला कितीही मायेने बोलले, तरी ते आपले अश्रू पुसणार नाही. त्यामुळे त्याला दयामाया न दाखवता आंदोलन केले,…

Read More

निर्मल उज्ज्वल सोसायटीला हायकोर्टाचा दणका:ठेवी स्वीकारण्यावरील बंदी कायम; थकबाकी कर्जावरील व्याज नफा दाखवून दिशाभूल केल्याचा ठपका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने संस्थेवर नवीन ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारने घातलेली बंदी कायम ठेवली असून, ठेवीदारांचे हित सर्वोच्च असल्याचे नमूद केले आहे. संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि निधीचा अपहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे, केंद्रीय सहकारी निबंधकांनी २४ एप्रिल २०२६…

Read More

SC म्हणाले- मंत्री शाह यांना अशा टिप्पण्यांची सवय:कर्नल सोफिया प्रकरणात MP सरकारला फटकारले, म्हटले- खूप झाले, आदेशाचे पालन करा

सेनादलातील महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कुंवर विजय शाह यांच्या अडचणी वाढत आहेत. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात खटला चालवण्याची परवानगी (अभियोजन स्वीकृती) देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल राज्य सरकारला फटकारले. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दांत म्हटले – “Enough is enough (आता खूप झाले), आता आमच्या आदेशाचे…

Read More

इम्तियाज जलील यांच्याकडून निदा खानची पाठराखण:पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका; मंत्री संजय शिरसाट यांना काडीचा भाव देत नसल्याचा टोला

एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिची पाठराखण केली. प्रस्तुत प्रकरणातील मुलीने आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. मी स्वतः एफआयआर वाचला. त्यात विशेष असे काहीच नाही. मी यापूर्वीच सदर तरुणीला तुझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही असे सांगितले…

Read More

एआय चॅटबॉटचा खोटा दावा:ब्रिटनमधून वैद्यकीय शिक्षण, 7 वर्षांचा अनुभव; बनावट परवाना क्रमांकही दिला, प्रथमच AI कंपनीवर खटला

तुम्ही तुमच्या आजाराची लक्षणे गुगलवर शोधता किंवा उपचारांसाठी एखाद्या एआय चॅटबॉटचा सल्ला घेत आहात का? जर होय, तर सावध व्हा. ज्याला तुम्ही तुमचा सहानुभूतीशील डॉक्टर समजून मनातील गोष्टी सांगत आहात, तो प्रत्यक्षात केवळ कोड आणि डेटाचा एक गठ्ठा असू शकतो. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया प्रांताने ‘कॅरेक्टर.एआय’ नावाच्या कंपनीवर अशाच एका प्रकरणात ऐतिहासिक खटला दाखल केला आहे. आरोप…

Read More

मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण:31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम

पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत. आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि गोरेगाव येथील नाला सफाई कामांची पाहणी केली. यावेळी…

Read More

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण- सर्व 22 आरोपी निर्दोष:बॉम्बे HC म्हणाले- ठोस पुरावे नाही, संशयावरून शिक्षा देऊ शकत नाही; ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम

बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी २००५ च्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्व २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणात सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांचीही हत्या झाली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सोहराबुद्दीनचे भाऊ, रुबाबुद्दीन, नयाबुद्दीन यांच्या याचिका फेटाळून लावल्या. ज्या २२ जणांना आरोपमुक्त…

Read More

‘पुष्पा’ फॉर्म्युला अल्लू पुन्हा वापरणार:‘राका’ मध्ये पात्रच बनेल चित्रपटाची ओळख, नवीन युनिव्हर्सची सुरुवात ठरू शकतो हा चित्रपट

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटांनी देशभरात ज्या प्रकारे विक्रमी यश मिळवले, त्यानंतर आता त्याच्या पुढील चित्रपट ‘राका’बद्दलही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळीही चित्रपटाचे शीर्षक थेट अल्लू अर्जुनच्या पात्राच्या नावावर ठेवण्यात आले आहे. इंडस्ट्रीमध्ये याला एक विचारपूर्वक आखलेली रणनीती मानले जात आहे, जिथे स्टारच्या पडद्यावरील प्रतिमेलाच चित्रपटाचे सर्वात…

Read More

सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था उरली नाही का?:भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही, पुण्याची कायदा-सुव्यवस्था रामभरोसे- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, अवकाळी पाऊस होत आहे. सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, पण कर्जमाफी झालेली नाही. राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तरी शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही आस्था नाही का असा प्रश्न पडतो, कारण घोषणा मोठ्या झाल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही, असे खासदार…

Read More

भाजप 2029 मध्ये एकनाथ शिंदेंना देणार धक्का:अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सांगितला प्लॅन

भाजप 2029 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर निवडून लढवेल, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. परिणामी, 2029 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या राजकारणात मोठे फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….

Read More