पदभार स्वीकारण्यापूर्वी नूतन पोलीस अधीक्षक साईचरणी झाले नतमस्तक:नागरिकांच्या सतर्कतेतूनच जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणे शक्य
प्रतिनिधी | शिर्डी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नव्याने नियुक्त झालेले सुदर्शन मुम्मुक्का यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी शिर्डीत जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. “जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर कडक लगाम घालणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. नूतन पोलीस अधीक्षक मुम्मुक्का म्हणाले, जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून…