डीजे वापराबाबत नियमांचे पालन आवश्यक- मुरलीधर मोहोळ:पुणे गणेशोत्सवात सांस्कृतिक परंपरा जपण्याचे केले आवाहन
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि मोठ्या क्षमतेच्या ध्वनियंत्रणांच्या वापराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्याची सांस्कृतिक परंपरा, कायदेशीर नियम आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित यांचा समतोल राखत उत्सवाचा आनंद साजरा करण्याचे आवाहन त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले. मोहोळ यांनी सांगितले की, गणेशोत्सव ही पुण्याची…