संजय नहार यांच्या कार्याला सुशीलकुमार शिंदे यांचा सलाम:'सरहद' संस्थेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त गौरवग्रंथाचे प्रकाशन, गडकरीही उपस्थित
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या कार्याचे कौतुक केले. देशाच्या ज्या भागात समस्या आणि दुःख आहेत, तिथे सर्वप्रथम पोहोचून ‘महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे’ असा संदेश देणाऱ्या नहार यांच्या समाजसेवेच्या यज्ञाला मी सलाम करतो, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त,…