Headlines

Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026



पुणे विभाग शिक्षक-पदवीधर मतदारसंघ 2026 साठी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट (टीडीएफ) म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीने आज आपल्या पुरस्कृत उमेदवाराची घोषणा केली. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ म

.

यावेळी शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात (पुणे), कार्याध्यक्ष नरसु पाटील (कोकण), कार्यवाह के. एस. ढोमसे (पुणे), पुणे विभाग अध्यक्ष शिवाजीराव कामथे, पुणे विभागाचे प्रवक्ते प्रा. शशिकांत शिंदे, प्रसिद्ध प्रमुख प्रा. संतोष थोरात यांच्यासह निवड समितीतील इतर राज्य कार्यकारणी सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कौस्तुभ गावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, पदवीधरांच्या रोजगाराचे प्रश्न, विनाअनुदानित शाळा, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, संच मान्यता आणि पवित्र पोर्टल यांसारख्या समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणार आहेत. त्यांनी सर्व शिक्षक आणि पदवीधर संघटनांना एकजूट होऊन टीडीएफला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही 1965 मध्ये स्व. आमदार तात्यासाहेब सुळे यांनी स्थापन केलेली राज्यातील एक जुनी आणि प्रमुख शिक्षक संघटना आहे. आतापर्यंत टीडीएफच्या माध्यमातून 20 ते 22 आमदारांनी महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले आहे. संघटनेने शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने आणि संपाच्या माध्यमातून सातत्याने लढा दिला आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी पुण्यात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये कौस्तुभ गावडे (कोल्हापूर), निळकंठ लिंगे (सोलापूर), सचिन सानप (पुणे) आणि एन. एस. पाटील (सांगली) या चार इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. राज्य कार्यकारिणी आणि निवड मंडळाने संघटनेशी असलेली बांधीलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव, मतदार संघात असलेला संपर्क आणि निवडून येण्याची क्षमता या सर्व गोष्टींचा विचार करून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *