उन्हाचा कहर, आजपासून शाळा 8 ते 11:जिल्हाधिकारी आशिया यांनी दिले आदेश मे महिन्यात पारा 43 अंशांवर जाण्याचा अंदाज
शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले आहेत. ९ एप्रिलला ३४ अंशांवर असलेला पारा अवघ्या नऊ दिवसांत ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (१७ मार्च) शहराचे तापमान ४० अंशावर होते. दिवसभर कडक उन्हाबरोबर सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार…