Headlines

अमरावती व्हिडिओकांड, तब्बल 48 पोलिसांच्या एसआयटीमार्फत तपास:आरोपीसोबत केक कापणारे 3 पोलिस निलंबित, राष्ट्रीय महिला आयोगही गंभीर



मुलींशी आक्षेपार्ह वर्तन आणि व्हिडिओ प्रकरणाच्या तपासासाठी १० अधिकाऱ्यांसह ४८ पोलिसांची ‘एसआयटी’ स्थापन केली असून त्यांची ५-६ पथके तयार केली आहेत. ही पथके शोषणाच्या जागांची झडती घेत आहेत. दुसरीकडे, मुख्य आरोपी अयान अहमद याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सह

.

आरोपीसोबत केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी एपीआय समीर शेख, पोलिस अंमलदार शुभम वर्मा आणि मयूर गुरव या तिघांना शुक्रवारी (दि. १७) निलंबित केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण पोलिसांकडून तपासाचा सविस्तर आढावा घेतला.

सोशल मीडियावरील ४१ खाती सायबर सेलकडून बंद

या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता सायबर सेलच्या मदतीने सोशल मीडियासंदर्भातही कारवाई करण्यात आली. पीडितांसंदर्भातील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असलेले ४१ संशयास्पद सोशल मीडियाची खाती बंद करण्यात आली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *