Headlines

साताऱ्यात किराणा दुकानावर पुरवठा विभागाची कारवाई:रेशनच्या बेकायदा साखर साठ्यासह महिला संचालिकेवर गुन्हा दाखल

गोरगरीब आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी राखीव असलेल्या रेशनिंगच्या साखरेचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. शहरातील कर्मवीर कॉलनी, राधिका रोड परिसरातील एका किराणा अँड जनरल स्टोअर्सवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २०७ किलो रेशनची साखर जप्त केली आहे. याप्रकरणी दुकानाच्या महिला संचालिकेवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

अवैध सावकारीवर कारवाई, परतवाडा-धोतरखेड्यात 4 पथकांचे छापे:कोरे स्टॅम्प, धनादेश आणि खरेदीखतांसह 69 संशयास्पद दस्तऐवज जप्त

परतवाडा शहर आणि धोतरखेडा परिसरात सर्रास सुरू असलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली. येथील जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या आदेशानुसार गठित चार विशेष पथकांनी पोलीस ताफ्यासह वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश, इसारचिठ्ठी आणि खरेदीखतांसह एकूण ६९ संशयास्पद दस्तऐवज…

Read More

मुख्यमंत्र्यांचे दोन दूत सीईओंच्या दिमतीला रुजू:अमरावती जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘व्हीसी’ला उपस्थिती

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या दिमतीला मुख्यमंत्र्यांचे दोन दूत (सीएम फेलो) रुजू झाले आहेत. मंगळवारपासून त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला (व्हीसी) उपस्थिती लावली. जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी आणि सीईओंना प्रशासकीय मदत पुरवण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. अबोली प्रमोद…

Read More

अमरावती अग्नितांडव प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी, 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संताप

डफरीन जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडव प्रकरणी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. सोमवारी रुग्णालयात व्हेंटिलेटरला आग लागल्याने तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोंडे यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली. ते म्हणाले की, “तीन लहान निष्पाप बाळांचा मृत्यू हा…

Read More

सीईओंचा जिल्हाभर पाहणी दौरा:शाळा, अंगणवाडी केंद्रांच्या सुधारणा, शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा

जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमधील मूलभूत सुधारणांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आग्रही झाले आहेत. त्यांनी जिल्हाभर पाहणी दौरा सुरू केला असून, आतापर्यंत सहा तालुक्यांचा दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीईओनी चांदूरबाजार, अमरावती आणि भातकुली तालुक्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नांदगाव खंडेश्वर आणि चिखलदरा तालुक्यांचा…

Read More

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या आगीप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केली आहे. भाकपच्या अमरावती महानगर कौन्सिलने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ही मागणी केली. २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नवजात शिशु कक्षामध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला,…

Read More

पालघरच्या गावात धर्म-परिवर्तनाचा प्रयत्न:22 महिलांवर गुन्हा, काही हैदराबादहून आल्या होत्या; धार्मिक पुस्तके देऊन सांगितले होते- आजार बरा होईल

पालघर जिल्ह्यातील वाकडपाडा गावात धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली 22 महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 ऑगस्ट रोजी मोखाडा येथील वाकडपाडा गावात घडली होती. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 299 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोखाडा पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात 22 महिलांना…

Read More

सरकारने साखर आयातीची अंतिम मुदत बदलली:आता एंट्रीच्या दोन महिन्यांत रिफाइंड साखर विकावी लागेल, 31 ऑक्टोबरची निश्चित अंतिम मुदत हटवली

देशातील साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयातीच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. सरकारने परदेशातून आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारात विकण्याची मुदत वाढवली आहे. आता आयातदारांना शिपमेंट भारतात पोहोचल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांचा कालावधी मिळेल. यापूर्वी सरकारने यासाठी 31 ऑक्टोबरची निश्चित अंतिम मुदत ठरवली होती. शिपिंग आणि वाहतुकीतील विलंबाबाबत साखर उद्योगाने चिंता व्यक्त…

Read More

मुंबईतील आंदोलनापूर्वी रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस:तुपकर म्हणाले- अशा नोटिसांना घाबरत नाही, 27 ऑगस्टला आंदोलन होणारच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलडाणा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये ही नोटीस देण्यात आली असून, आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी तुपकरांना निर्देश दिले आहेत. मात्र, नोटीस मिळाल्यानंतर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत ‘अशा…

Read More

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी कंपन्यांना देण्यास मंजुरी:आकाश, अस्त्र आणि नाग क्षेपणास्त्रे बनू शकतात; राजनाथ म्हणाले- देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचे तंत्रज्ञान भारतीय खासगी कंपन्यांना देण्यास मंजुरी दिली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर देशात क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी केला जाईल. या उपक्रमाचा उद्देश देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढवणे हा आहे. या अंतर्गत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) पात्र संरक्षण कंपन्यांना क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देईल. खासगी कंपन्या स्वदेशी उत्पादन…

Read More