Headlines

चाकणमध्ये दोन 10 एमव्हीए रोहित्रे कार्यान्वित:महावितरण संचालकांनी वीज यंत्रणेची पाहणी करत उपाययोजनांना गती दिली

चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली. या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण…

Read More

नागपुरात 4 हजार तरुणांनी ढोल-ताशा वादनाचा विश्वविक्रम केला:एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; 585 ध्वजधारकांचा सहभाग

नागपूरमध्ये रविवारी ढोल-ताशा वादनाचा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४ हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ढोल आणि ताशा वाजवले. या भव्य सांस्कृतिक महासंगमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृतपणे नोंद झाली आहे. हा विक्रम ‘जेनझी संवाद’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विदर्भातील विविध शहरांमधून २०० हून अधिक ढोल-ताशा पथकांना एकाच…

Read More

खड्ड्यांमुळे मृत मुलाच्या कुटुंबाला 6 लाखांची भरपाई द्या:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सूचना

सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या मुलाच्या कुटुंबाला तातडीने सहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी सूचना पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत, महापालिकेने स्वतःहून हे प्रकरण संबंधित समितीसमोर मांडावे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया त्वरित…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपुरात पार्थिव शिवलिंग निर्मिती:मानकापूरमधील सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती, 91 लाखांचा संकल्प

नागपूरच्या मानकापूर येथे आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्वतः मातीची शिवलिंगे तयार करून महादेवाचे दर्शन घेतले. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. मानकापूर येथील शिवमंदिर परिसरात हा भव्य उपक्रम तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आला आहे. १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महिनाभराच्या सोहळ्यात यंदा ९१…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह व्हिडीओवरून साताऱ्यात गुन्हा

सोशल मीडियावर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे नऊच्या सुमारास पोवई नाका परिसरात असताना ‘Adorable Vidzee’ आणि ‘Insta Satara’ या इन्स्टाग्राम खात्यांवरून संबंधित व्हिडीओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारीनुसार, व्हिडीओमध्ये हिंदू धर्मीय…

Read More

मुंबईतील मोकळ्या मैदानांसाठी आदित्य ठाकरेंचे 'तिरंगा आंदोलन':अनेक भूखंड गिळंकृत केल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या युवासंवादावरही साधला निशाणा

मुंबई येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर आज तिरंगा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईमधील जी मोकळे मैदान होती, ती पुन्हा एकदा मुलांसाठी मोकळी उपलब्ध मिळायला हवीत या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हे आंदोलन केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसेच महायुती सरकारवर टीका केली आहे. सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आज आपण…

Read More

सुपा MIDC मधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश, तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडून दूषित सांडपाणी सोडून परिसरातील नैसर्गिक पाणीस्रोत प्रदूषित केले जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून समोर आल्या होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रदूषण करणाऱ्या या कंपन्यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात तातडीने कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या स्पष्ट…

Read More

पहिल्या भारतीय महिला मिमिक्री कलाकार आशा सिंह यांचे निधन:मीना कुमारींच्या नक्कलमुळे प्रसिद्धी मिळाली, बीआर चोप्राच्या महाभारतात द्रोणाचार्यांची पत्नी

ज्येष्ठ अभिनेत्री आणि भारताच्या पहिल्या महिला मिमिक्री आर्टिस्ट आशा सिंह जयस्वाल यांचे निधन झाले आहे. त्यांनी 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे 7:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आकाश भारद्वाज यांनी पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. आशा यांना भारताच्या पहिल्या महिला मिमिक्री आर्टिस्ट मानले जाते. त्या हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांच्या आवाजाची…

Read More

हरियाणात पतीची हत्या, आतडे पोत्यात भरले:छातीपासून प्रायव्हेट पार्टपर्यंत एक फूट कापले; यकृत-मूत्रपिंड गायब; पत्नीने छतावरून उडी मारली

हरियाणामधील कुरुक्षेत्रात एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. तिने धारदार शस्त्राने पतीच्या छातीपासून ते गुप्तांगापर्यंत एक फुटापेक्षा जास्त लांब कट मारला. महिलेने त्याची आतडी काढून प्लास्टिकच्या पोत्यात भरून ठेवली. महिला ज्यावेळी ही घटना घडवत होती, त्याचवेळी घरमालक आला. त्याला पाहून महिलेने छतावरून खाली उडी मारली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी घडली….

Read More

आंबेकरजींचा आदर्श पुढे नेणे काळाची गरज!:पोस्ट तिकिटाचे अनावरण; कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार- सचिन अहिर

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा गांधी सभा गृहात संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्वर्गीय गं.द. आंबेकर यांची 120 वी जयंती संपन्न झाली. उपसभापती सचिन अहिर यांच्याहस्ते कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या नावे पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करून आज इतिहास रचला गेला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र सर्कल, चीफ पोस्ट…

Read More