Headlines

भिवंडी-कल्याण बायपासवर ट्रकला आग:मंत्री गिरीश महाजन यांची तत्काळ धाव, मदतीच्या केल्या सुचना

भिवंडी-कल्याण बायपासवर धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. दरम्यान, याच मार्गावरून जात असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून मदतीसाठी आवश्यक आदेश दिले. भिवंडी-कल्याण बायपासजवळ आज दुपारच्या सुमारास वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रकचालकाने प्रसंगावधान…

Read More

महामार्गांच्या नावाखाली हजारो कोटींचा खेळ:35 हजार कोटींच्या प्रकल्पांचा हिशेब द्या, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘समृद्धी महामार्ग’ आणि प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या महामार्गांच्या नावाखाली राज्यात हजारो कोटी रुपयांचा खेळ सुरू असून, यातून जनतेला समृद्धी आणि शक्ती मिळणार की केवळ काही ठराविक कंत्राटदारांचीच ‘समृद्धी’ होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मोजक्याच कंत्राटदारांवर मेहरबानी का?…

Read More

भंडाऱ्यात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग:तांत्रिक बिघाडामुळे वीक सिग्नल, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात एका खासगी हेलिकॉप्टरने आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक बिघाडामुळे ‘वीक सिग्नल’ मिळाल्याने वैमानिकाने निलज आणि बिसारी गावाजवळच्या तलावाकाठी हे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्राप्त माहितीनुसार, ‘व्हीटी-पीबीएन’ क्रमांकाचे हे खासगी हेलिकॉप्टर हवेत असताना अचानक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. यंत्रणेला ‘वीक सिग्नल’ मिळू लागल्याने वैमानिकाने…

Read More

चंद्रपूर महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 84 महिलांची फसवणूक!:आरोपीने 3 वर्षात कोट्यवधी उकळल्याचा संशय, एकाला अटक

चंद्रपूर महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 84 महिलांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा हा 250 पेक्षा अधिक असल्याचेही बोलले जात आहे. चंद्रपूर मानपात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने या महिलांची जवळपास लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समजते. मनपाच्या स्वच्छता विभागात भटकी कुत्री पकडणाऱ्या पथकात जितेंद्र सारसर नामक कर्मचारी कार्यरत…

Read More

अभिनेत्री ते उद्योजिका: अमृता खानविलकरची 'अमूल्य' भरारी!:'अमूल्यवैभव' प्रदर्शनाला एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट, एकाच छताखाली 61 ब्रँड्सचे भव्य प्रदर्शन

अभिनयाच्या सोबतीने उद्योजिका झालेली अमृता खानविलकर सध्या तिच्या ‘अमूल्य’ या साडी ब्रॅंडमुळे विशेष चर्चेत असून नुकतेच ठाणे क्लब येथे भरलेल्या अमूल्यवैभव या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. अमृताच्या ‘अमूल्य’ या ब्रँड सोबत अजून 61 स्टॉल या प्रदर्शनात बघायला मिळतात. सणासुदीसाठी शॉपिंग करण्यासाठी अमूल्यवैभव हे वन स्टॉप डेस्टिनेशन ठरत आहे. ब्रॅंड सुरू करून अवघ्या पाच महिन्यात तिने…

Read More

जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा:29 ऑगस्टला अंतिम भूमिका, त्याआधी सरकारचा डाव पडला तर मुंबईकडे कूच

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. ओबीसींसाठी काढलेला जीआर लागू करण्यासोबतच आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या केसेस मागे घेण्याची आणि प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. “प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत अंतिम भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत, त्याआधी…

Read More

प्रक्षोभक भाषा करणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल करून अटक करा:सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी, महेश लांडगेंच्या वक्तव्यावरून संताप

सांगलीत एका मोर्चादरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लांडगे यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर अतिशय कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या या आमदारावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,…

Read More

AI भारतात नोकऱ्या हिरावून घेण्याऐवजी अधिक देत आहे:नोमुरा अहवालात दावा – वरिष्ठ कर्मचाऱ्यांची मागणी वाढली, कोडिंग आणि टेस्टिंग जॉब धोक्यात

भारतात AI नोकऱ्या कमी करण्याऐवजी नवीन रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करत आहे. मात्र, तांत्रिक बदलांमुळे नोकरीची सुरुवात करणाऱ्या फ्रेशर्सना आणि तरुणांना एंट्री-लेव्हलवर कठोर स्पर्धा आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा दावा नोमुराने अलीकडेच प्रकाशित केलेल्या एका अहवालात केला आहे. आशियामध्ये 1.31 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या, 61 हजार गेल्या नोमुराने ‘बियॉन्ड द हेडलाइन्स: एआय हॅज…

Read More

रुग्णालयाच्या बाहेर दिसले गोविंदा:दुसऱ्या लग्नाच्या दाव्यावर मॅनेजरने दिली प्रतिक्रिया; खोट्या बातम्यांबद्दल अभिनेत्याने नोटीस जारी केली

अभिनेता गोविंदाला शनिवारी मुंबईतील जुहू येथील रुग्णालयाबाहेर पाहिले गेले. मात्र, गोविंदा रुग्णालयात का गेले होते, याचे कारण समोर आले नाही. दुसरीकडे, वैयक्तिक आयुष्याबद्दल पसरलेल्या अफवांवर अभिनेत्याकडून सार्वजनिक नोटीस जारी करण्यात आली. वृत्तसंस्था एएनआयच्या मते, नोटीसमध्ये मीडिया संस्था, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कंटेंट क्रिएटर्सना गोविंदा किंवा त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खोटा, बदनामीकारक, चुकीच्या हेतूने तयार केलेला, मनगढंत किंवा…

Read More

वाशिममध्ये आश्चर्यकारक घटना:राजुरा गावात 12 वर्षे जुन्या बोअरवेलमधून 20 दिवसांपासून सतत गरम पाणी, नमुने तपासणीसाठी नागपूरला

वाशिम जिल्ह्यातील राजूरा गावात सध्या एका आश्चर्यकारक घटनेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गावात असलेल्या तब्बल 12 वर्षे जुन्या बोअरवेलमधून गेल्या 20 ते 25 दिवसांपासून सातत्याने गरम पाणी बाहेर येत आहे. एरवी थंड आणि सामान्य पाणी देणाऱ्या या बोअरवेलमधून अचानक गरम पाणी येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल, आश्चर्य आणि काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More