बीडमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत:घरासमोर खेळणाऱ्या 3 वर्षीय चिमुकलीवर हल्ला; चेहऱ्याला पडले 12 टाके
बीड शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धांडे नगर भागातील शिवतेज नगरमध्ये घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या 3 वर्षांच्या एका चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चेहऱ्याला पडले 12 टाके शिवांशी घोलप असे या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 3 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. या भीषण…