अहिल्यानगरच्या उद्योगविश्वाला बूस्टर; 13 हजार कोटींची विक्रमी गुंतवणूक:83 उद्योगांचे करार;सुपा, शिर्डीत 11 हजार 948 रोजगारांची निर्मिती
प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत शुक्रवारी ८३ उद्योगांनी तब्बल १३ हजार १७३ कोटी ७१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. या गुंतवणुकीमुळे सुपा, शिर्डी, श्रीरामपूर आणि नेवासा या औद्योगिक क्षेत्रांत तब्बल ११ हजार ९४८ नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप मिळण्याची शक्यता आहे….