Headlines

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण विभागाला निर्देश, कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेजी तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेऊन राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांची, योजनांची आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांना दिली. शिक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करताना शिंदे यांनी शिक्षण…

Read More

आमदार-खासदार फोडायला रातोरात खोके जातात:मग कर्जमाफीला विलंब का? रोहित पवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “आमदार आणि खासदार फोडताना रातोरात पैशांचे खोके पाठवले जातात, मात्र जेव्हा विषय अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा येतो, तेव्हाच सरकारला विलंब का होतो?” असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे….

Read More

राहुल गांधी महिला आरक्षणविरोधी, पुण्यात येऊन मारल्या सक्षमीकरणाच्या गप्पा मारतात:'मातोश्री 2 पॅटर्न'ने मुंबईला लुटले, नवनाथ बन यांचा ठाकरे अन् काँग्रेसवर घणाघाती हल्ला

राहुल गांधी महिला आरक्षणाला विरोध करणारे आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरणावर बोलू नये, संसदेत महिला आरक्षणाचा बिल आले तर यांनी त्यासाठी विरोध केला. महिला सक्षमीकरणाला विरोध करण्याचे काम संसदेत राहुल गांधींकडून करण्यात आले आणि दुसरीकडे पैसो की गुंज कार्यक्रमात मात्र महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, जामनेर पॅटर्नचे…

Read More

अनमोल क्वात्राचा पंजाबी गायकाशी वाद का झाला:पॉडकास्टसाठी ₹2-₹3 लाख मागितल्याने मैत्री बिघडली; सोशल वर्कर म्हणाले- आज पुरावे येतील

लुधियानाच्या प्रसिद्ध समाजसेवक अनमोल क्वात्रा आणि ‘सणे सरपंच सारा पिंड कुट दूं’ या वादग्रस्त गाण्यामुळे प्रसिद्ध झालेले पंजाबी गायक गुलाब सिद्धू यांच्यात वाद वाढला. हा वाद पॉडकास्टच्या बदल्यात पैसे मागण्यावरून झाला. एकमेकांना ‘भाई’ आणि ‘जान’ म्हणणाऱ्या या दोन्ही मित्रांच्या भांडणात चाहतेही उतरले. त्यांनी पॉडकास्ट करण्यासाठी पैसे मागितल्याबद्दल अनमोल क्वात्राला ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र यानंतर…

Read More

आईने 2 चिमुकल्यांना गळफास देऊन स्वतःही संपवले जीवन:कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना

जयसिंगपूर शहरातील मच्छी मार्केट परिसरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्या मुलांना गळफास लावून स्वतःही आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संगीता गाडीवडर, मुलगी प्रगती आणि मुलगा प्रतीक अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संगीता…

Read More

पत्नीने CCTV बंद केले, भावांनी पतीला मारहाण केली:दिल्लीत अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणात खुलासा; आतापर्यंत चार आरोपींना अटक

दिल्लीतील निहाल विहारमध्ये 31 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता विनय गुप्ता यांच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत. तपासात समोर आले आहे की, 21 ऑगस्ट रोजी घटनेपूर्वी विनयची पत्नी रेखाने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला होता. यानंतर रेखाच्या माहेरच्या लोकांनी विनयला मारहाण केली. रुग्णालयात नेत असताना विनयचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी पत्नी रेखासह चार जणांना अटक…

Read More

पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको:भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये ग्रामस्थांचा एल्गार, ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह आंदोलन

भोर तालुक्यातील प्रस्तावित भोंगवली सबस्टेशन आणि ७६५ केव्ही क्षमतेच्या टॉवर लाईन प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा असंतोष आता उफाळून आला आहे. या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी आज बाधित गावकऱ्यांनी पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि चक्क जनावरांसह रस्त्यावर उतरून भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली…

Read More

शिक्षकाने रागावल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या:चंद्रपूर शहरात नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल

चंद्रपूर शहरात नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत मुख्याध्यापकांनी रागावल्याच्या घटनेनंतर घरी परतलेल्या विद्यार्थिनीने शनिवारी (22 ऑगस्ट) आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तनिष्का सुनील गाडगे (वय 14, रा. आनंदनगर प्लाझा अपार्टमेंट, चंद्रपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. नेमक प्रकरण काय मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी चंद्रपूर शहरातील कार्मेल…

Read More

अभिनेत्री तापसी पन्नूच्या विधानावर कंगना रनोट संतापल्या:म्हणाल्या- बी-ग्रेड चित्रपटासाठी 'स्वस्त कॉपी'ने सर्व मर्यादा ओलांडल्या

तापसी पन्नूने कंगना रनोटसोबतच्या मतभेदांवर दिलेल्या वक्तव्यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया दिली. तापसी म्हणाली होती की ती वादापूर्वी किंवा नंतर कधीही कंगनाला भेटली नाही. त्यानंतर कंगनाने तापसीवर तिच्या संगोपन आणि पालकांची खिल्ली उडवल्याचा आरोप करत तिला ‘स्वस्त कॉपी’ म्हटले. खरं तर, नुकत्याच इंडिया टुडेसोबतच्या संवादात तापसीला विचारण्यात आले की तिने आणि कंगनाने त्यांचे मतभेद मिटवले…

Read More

केज तालुक्यात 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार:जाब विचारल्याने आईला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीस आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन तरुणांसह जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या आईला बेदम मारहाण करणाऱ्या नातेवाइकांवर, अशा एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील इयत्ता…

Read More