तुकाराम मुंढेंच्या विरोधात व्यापाऱ्यांची बैठक:सुट्टे खाद्यतेल विक्री बंदीवरून आक्रमक; राज्य सरकारला 15 दिवसांचा 'अल्टिमेटम'
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात सुट्टे खाद्यतेल विकण्यावर आणि खरेदी करण्यावर बंदी घालण्याचे कडक आदेश दिले आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील खाद्यतेल व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयाच्या विरोधात नाशिकमध्ये राज्यातील व्यापाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला पंधरा दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला असून, सरकारने…